आम आदमी पार्टीचे वीज दरवाढ विरोधात राज्यव्यापी आंदोलन.

आपण काही दिवसापूर्वी पाहिले की एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करून आपला स्वतःचा शिंदे गट निर्माण केला. बंड करून ते गुजरात- आसाम असा दौरा केला आणि त्यानंतर भाजपासोबत त्यांनी मिळून सत्ता स्थापनेचा दावा केला. सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर बऱ्याच लोकांचा रोष त्यांनी ओढवून घेतला होता तरी देखील लोकांना एक सकारात्मक असा अपेक्षित बदल अपेक्षित होता की शिंदे गट आणि भाजपा यांच्या युती नंतर काही गोष्टींमध्ये महागाई कमी होईल. जसे की इंधन, गॅस यासारख्या कायम महाग होत जाणाऱ्या वस्तूकडे लोक अपेक्षेने पाहत होते. पण सत्ता स्थापन झाल्यानंतर अगदी काही दिवसांमध्येच जे विज बिल येते त्या वीज बिले मध्ये दरवाढ करण्यात आली आहे.
सत्ता स्थापनेनंतर जे लोक अपेक्षेने महागाई कमी होईल अश्या अपेक्षेने लोक भाजपाकडे आणि शिंदे गटाकडे पाहत होते की, यांच्या सत्ता स्थापनेनंतर तरी महागाई थोडीफार का होईना कमी होईल पण महागाई कमी व्हायचे कुठेच चिन्हे दिसत नाहीये. आणि अशातच वीज दरवाढ झाली आहे या दरवाढीचा विरोधामध्ये आम आदमी पार्टी गोंदिया या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आम आदमी रैनबसेरा येथे एक बैठक घेतली. आणि या बैठकीमध्ये दरवाढ विरोधात राज्यव्यापी आंदोलन यशस्वी करण्याचे ठरवण्यात आले. महागाईमुळे होरपळलेल्या महाराष्ट्रात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने विजेच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ करून सर्वसामान्यांना आर्थिक झटका दिला आहे.
राज्य सरकार या जनविरोधी निर्णयाच्या विरोधामध्ये आम आदमी पक्षाने १३ जुलै रोजी जयस्तंभ चौक येथे राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ते मध्ये येणारे सरकार हे लोकांना खोटी आश्वासने देऊन त्यांची फसवणूक करत आहे. आणि यामध्ये आम आदमी पार्टी ही शांत राहणार नसून या नव्या सावकारी सरकारच्या वीज दरवाढ विरोधात कंबर करणार आहे. त्याच प्रमाणे आम आदमी पार्टीने सर्व जनसामान्यांना आवाहन केले आहे की, 13 जुलै रोजी आंदोलनांमध्ये बहुसंख्य जनतेने सहभागी होऊन वीज दरवाढीचा विरोध करावा.
दिल्ली आणि पंजाब मधील सरकार जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत असून जनतेला 200 युनिट प्रतिमहिना वीज मोफत देते. दिल्लीतील 72 टक्के जनतेला वीजबिल शून्य येते पंजाब मधील जनतेला ०१ जुलै २०२२ पासून 300 युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन पूर्ण केले. पण महाराष्ट्रात सरकारला २.५ रुपये युनिट मिळणारी वीज १०-१५ रुपये युनिट विकणारे सावकारी सरकार या सरकारचा विरोध करण्यासाठी म्हणून जास्त प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे.
या बैठकीमध्ये जिल्हा संयोजक उमेश दमाहे, जिल्हा सचिव मिलन चौधरी, गोंदिया शहर अध्यक्ष करण चिचखेड़े, शहर महिला अध्यक्ष प्रमिला उईके, शहर युवा अध्यक्ष अंकुश वाखले, सचिव मिलिंद नागदेवे, कोषाध्यक्ष अशोक कुर्वे, यशवंत मेश्राम, अनामिका अग्रवाल इत्यादी पदाधिकारी हजर होते