अबब ! रात्री सगळे झोपेत असताना घरात नको त्या पाहुण्याची ” एन्ट्री ” पहा बातमी सविस्तर.
बऱ्याचदा ग्रामीण भागात शेतांमध्ये बिबट्या धुमाकूळ घालतो. जे पशुधन असेल त्यावरती हल्ला चढवतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होता. मात्र ठाण्यातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते.
ठाण्यातील शहापूर तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास घरात बिबट्या घुसला त्यानंतर वस्तीत एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आणि त्यानंतर वनविभाग त्या ठिकाणी आलं या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश देखील आलं.
मात्र पूर्ण प्रकरण काय आहे, तर मागील काही दिवसात मानवी वस्तीतही बिबट्या आढळून येण्याचे प्रमाण वाढला आहे. घरात बिबट्या घुसल्याने सर्वजण घाबरून गेले. उमरखांड गावात लहू निमसे यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. रात्री दोन ते अडीच च्या दरम्यान बिबट्याने शिरगाव केला. लहू निमसे यांनी वनविभागाला ही माहिती दिली. आणि त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी ही कसरत चालू होती.
निमसे यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या पाळीव कोंबड्या ओरडण्याच्या जोरात आवाज आला. त्यामुळे घरातील सदस्य हे जागे झाले बाजूच्या घरात त्यांचा मुलगा झोपला होता. प्रसंगावधन राखलं आणि बिबट्या शिरलेल्या रूमचा दरवाजास कडी लावून घेतली. त्यानंतर तात्काळ वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर वन विभाग त्या ठिकाणी दाखल झाला.
पोलिसांनी आणि वनविभागाने त्या बिबट्याला रेस्क्यू केला. तब्बल ७ तासाच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात आले. तपासणी केल्यानंतर या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले मात्र माणसांच्या घरांमध्ये बिबट्याने शिरणं हा धक्कादायक प्रकार आहे. हा बिबट्या या ठिकाणी कुठल्या शोधात आला असेल हा बिबट्या नेमका कुठल्या भागातला आहे या सगळ्याचा आढावा आता वन विभाग घेत आहे.