अहिल्यानगर MIDC वर्धापनाच्या सामाजिक कामात कृष्णाली फाऊंडेशनचा सक्रिय सहभाग.

६३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन.
नगर प्रतिनिधी,
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर राज्याच्या समतोल विकासासाठी औद्योगिकीकरण होणे आवश्यक असल्याची विचारधारा समोर आली. यातून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची १ आगस्ट १९६२ रोजी स्थापना झाली. आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी १ ऑगस्टला प्रत्येक जिल्ह्यामध्ये एमआयडीसीचा वर्धापन दिन साजरा होतो ,अहिल्यानगरचा हा वर्धापन दिन खऱ्या अर्थाने जास्त चर्चेला जात आहे कारण या ६३ वा वर्धापन दिन असल्यामुळे ६३जणांनी रक्तदान केले, आणि हरितक्रांतीचा विचार करत एमआयडीसी परिसरातच वृक्षारोपणही करण्यात आले.

या उपक्रमाच्या निमित्ताने सामाजिक जबाबदारी आणि औद्योगीकरण याची सांगड घालण्यात आली, यावेळी MIDC व कृष्णाली फाऊंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सामाजिक कामात अग्रेसर असणारी संस्था म्हणून कृष्णाली फाऊंडेशन कडे पाहिले जाते, शिक्षण , आरोग्य, महिला आणि पर्यावरण या विषयावर फाउंडेशन चे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके काम करतात.वर्धापन दिनाचे औचित्य साधत एमआयडीसी अग्निशामक विभागाच्या वतीने देखील भव्य वृक्षारोपण करण्यात आले आणि एमआयडीसीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला

माऊली सभागृह येथे एमआयडीसी प्रत्येक वर्षी वर्धापन दिन साजरा करत असताना कार्यालय अंतर्गत वेगवेगळ्या खेळांचा आयोजन करत या स्पर्धा मधील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला तसेच कर्मचारी अधिकाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा MIDC कडून रोख रक्कम व कृष्णाली फाउंडेशनवतीने ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला, तसेच फाउंडेशनच्या वतीने रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं,या कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी अहिल्यानगरचे राठोड सर यांनी आपलं मत व्यक्त केल ते म्हणाले “एमआयडीसीच्या भरभराटीसाठी आम्ही नेहमीच सदैव तत्पर असतो , मात्र आत्ता आपण पहात असू वृक्षतोडीमुळे ढासळत चाललेला पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपणात प्रत्येकाने सहभाग घ्यावा, समाजाचे भान म्हणून रक्तदान करणं हे देखील पुण्याचं काम आहे त्यामुळे रक्तदान शिबिरासाठी आम्हाला कृष्णाली फाउंडेशनच सहकार्य मिळालं, असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवायला हवेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या
तसे कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे उपअभियंता अनुसे हे म्हणाले की ” यापुढे देखील आपण अशाच सामाजिक उपक्रम एमआयडीसीमध्ये राबवत राहू आपल्या उद्योजकांना देखील अशा सामाजिक कामांमध्ये सहभागी करून घेऊ आणि एमआयडीसीच्या भरभराटीसाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहो अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या

एखाद्या शहराची खऱ्या अर्थाने कामधेनु म्हणून एमआयडीसी कडे पाहिले जात , एमआयडीसी मुळे त्या शहराची भरभराटी होत असते आणि अशाच कामधेनुला कृष्णाली फाउंडेशनच्या वतीने वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत या ठिकाणी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांनी धन्यवाद व्यक्त केले, भव्य रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी साई सेवा ब्लड बँकचे अजित जगताप यांचं विशेष सहकार्य लाभल, यावेळी श्री.गणेश राठोड प्रादेशिक अधिकारी, उपअभियंता श्री सरदार अनुसे,श्री.दिलीप काकडे क्षेत्र व्यवस्थापक अग्निशामक अधिकारी जगजितसिंग जाट तसेच आमीचे अध्यक्ष खकाळ जी एस, उपाध्यक्ष महेश इंदानी,श्रीहरी टिपूगडे सिद्धी फोर्ज चे संचालक, कृष्णाली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, पत्रकार प्रियंका पाटील शेळके व पवन सदाफळे, अजित जगताप आदी मान्यवर उपस्थित होते
