कौतुकास्पद : 9 महिन्यांची गर्भवती असताना देशाला मिळून दिलं कांस्य पदक !

आपल्या घरात एखादी स्त्री गर्भवती असल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक जनतेची विशेष काळजी घेतो, कारण तिच्या सोबत एक छोटा जीव वाढत असतो, बराचदा तीला खाण्या पिण्याचे सल्ला दिले जातात. उठण्या बसण्याचेही सल्ले दिले जातात. अगदी फुलासारखं त्या गर्भवतीला सांभाळलं जातं. हे करू नको ते करू नको असं करू नको , हे खाऊ नको ते खाऊ नको असं घरातील लहान मोठे सगळे सांगत असतात.
प्रत्येक महिन्याला तपासणी असेल त्यानंतर औषध गोळ्या असतील योग्य तो उपचार असेल योग्य तो आहार असेल. व्यायाम असेल याकडे विशेष लक्ष दिल जात कारण गर्भवती महिलेची जितकी काळजी घेतली जाईल तितकं तिच्या बाळाचा आरोग्य सुदृढ राहिलं, त्यामुळे गर्भवती महिला यांना जास्तीत जास्त आराम करणं, आनंदी रहाणे, कुठलेही अवजड काम न करणे असे सल्ला दिले जातात. मात्र गर्भवती असताना असं काहीतरी करून दाखवणे ज्यांने आपल्या देशाची मान उंचवेल, आणि आपल्याला देखील आत्मिक समाधान मिळेल यामध्ये ही बातमी तुमच्यासाठी आशावादी ठरू शकते प्रेरणादायी ठरू शकते आणि कौतुकास्पद देखील आहे.
नऊ महिन्याची गर्भवती असतानाही ऑलिम्पियाड2022 मध्ये महिला संघात कांस्यपदक पटकावला. मागील दोन वर्षांमुळे बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 ही स्पर्धा ऑनलाइन पार पडत होती. यंदाच्या वर्षी भारताच्या चेन्नई शहरात खेळली गेली. या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या महिला गटान कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. भारतीय संघातून कोनेरू हम्पी ,हरिका द्रोणवल्ली, तनया सचदेव, वैशाली आणि भक्ती कुलकर्णी यांनीही कामगिरी करून दाखवली.
हरीका या गर्भवती असताना अशा परिस्थितीतही त्या खेळ खेळल्या. त्यांचा हा खेळण्याचा प्रवास प्रेरणादायी ठरतोय. नऊ महिन्याची गर्भवती असतानाही तिने करून दाखवलं. या विजयानंतर हरीका म्हणाल्या, मी वयाच्या तेराव्या वर्षी महिला बुद्धिबळ संघात पदार्पण केलं तेव्हापासून खेळत आहे. 18 वर्षे झाली आहेत आणि आतापर्यंत नऊ ओलंपियाड खेळल्यानंतर पहिली महिला संघासाठी पदक घेण्यासाठी पोडियम वर येणे माझे स्वप्न होतं, जे आता शेवटी पूर्ण झाल. त्यात मी नऊ महिन्याची गर्भवती असताना हे स्वप्न साकारल्याने अधिक भावनिक आहे. मी माझ्या डॉक्टरांशी खेळण्याबद्दल सल्ला घेतला त्यांनी सांगितलं तू योग्य ती काळजी घे तणाव घेऊ नकोस आणि मग तू हा खेळ खेळू शकतेस.
संपूर्ण वेळ हा सराव आणि सामन्यात गेल्याने कोणतीच पार्टी, बेबी शॉवर तसेच सेलिब्रेशन करता आलं नाही. पण मी ठरवलं की, पदक जिंकल्यावर मी सेलिब्रेशन करेल ते मी करून दाखवलं असं म्हणत त्यांनी आनंद साजरा केला. बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 स्पर्धेत भारताच्या महिलांनी कांस्यपदक मिळवलं. संघातील खेळाडूंमध्ये ग्रँडमास्टर हरीका द्रोणवली या सहभागी होत्या विशेष म्हणजे त्या नऊ महिन्याच्या गर्भवती असताना भारताला त्यांनी कास्य पदक मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली.