आलिया नंतर या अभिनेत्रीने दिली ” गुड न्यूज. “
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये जोड्या चर्चेचा विषय ठरत असतो. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील बऱ्याच अभिनेता व अभिनेत्री यांनी लग्न देखील केले आहेत. त्याचप्रमाणे कित्येकांच्या लव्हस्टोरी आपण पाहिल्या व ऐकल्या आहेत. सर्वात जास्त ज्या जोडीबद्दल चर्चा होती ती म्हणजे सलमान आणि कतरिना पण काही दिवसानंतर सलमान व कतरिना. यांच्या नात्याचा फुलस्टॉप लागला त्यानंतर अभिनेत्री कतरिना हिचे नाव राजकुमार संतोषी च्या ‘ अजब प्रेम की गजब कहानी ‘ मधील अभिनेता रणबीर कपूर यांच्यासोबत जोडले गेले. व त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना उधन आलं. या चित्रपटाच्या दरम्यान या दोघांच्या अफेयरची चर्चा जरी होत असली तरी, तोपर्यंत सलमान आणि कतरिना नातं संपलेलं नव्हतं. पण रणबीर व दीपिकाच्या नात्याला फुल स्टॉप लागला होता.
काही दिवसानंतर रणबीर व कतरीना यांच्या नात्याबद्दल खूप व्हायरल बातम्या झाल्या. पण या दोघांनी एकमेकांसोबतच्या नात्याची कबुली कधीच दिली नाही. पण असंही सांगितलं जातं की, या दोघांनी मिळून एक वेगळा अपारमेंट घेतलं होतं की, ज्या ठिकाणी हे दोघेच राहायचे. यानंतर रणबीरच्या आईने या आपारमेंट घेण्यावर आक्षेप लावला होता. त्यातच अचानक सोनम कपूर च्या लग्नामध्ये आलीया व रणबीर हे दोघे सोबत दिसली. आणि इकडे दुसरीकडे कतरिना व विकीचे नात्याला सुरुवात झाली होती.
यामध्ये दोघांच्या आयुष्यात सारख्याच गोष्टी घडत होत्या, त्या सोबतच घडत होत्या. आता काही दिवसांपूर्वी कतरिनाच्या लग्नाचा शाही सोहळा पार पडला. या दोघांच्या लग्नाचा जवळपास महिनाही उलटत नाही तेवढ्यात रणवीर यांच्या लग्नाच्या बातम्या पसरू लागल्या. यामध्ये वेगळी बाब अशी होती की, कतरिना व विकी च लग्न जेवढ्या मोठ्या थाटामाटात झालं त्यापेक्षाही साधेपणाने रणवीर व आलिया या दोघांनी लग्न केलं. यामध्ये कतरिना कैफ – रणबीर कपूर हे आपापल्या आयुष्यामध्ये व्यवस्थित रीत्या प्रवास करत आहेत. दोघांचाही संसारिक / वैवाहिक प्रवास छान प्रकारे चालू आहे.
आता तुम्ही म्हणाल की रणबीर आणि कतरिनाच्या आयुष्याच्या साम्याबद्दल एवढं का बोलले जाते ? बातमी पण तशीच आहे नुकतंच काही दिवसांपूर्वी पासून आलीयाच्या गुड न्यूज ची बातमी व्हायरल होत आहे. आलिया आता आई होणार आहे. तशीच कतरिना ने सुद्धा गुड न्यूज दिली आहे. जशी आली आई होणार आहे तसेच कतरीना आई होणार नसून तीने तिच्या लग्नानंतर पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. लग्नाच्या खुप दिवसानंतर कतरिना ‘ फोन भूत. या चित्रपटांमधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच सोशल मीडियावर तिने तशी पोस्ट देखील केली आहे. त्यामध्ये तिने आगामी चित्रपट ‘ फोन भूत ” व त्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सर्व काही जाहीर केले आहे. त्यामध्ये ती म्हणते की ‘ फोन भूतच्या जगात तुमचे स्वागत आहे ‘ असं म्हणून तिने चित्रपटाचे टीजर शेअर केलं आहे अभिनेत्री कतरिनाचा हा चित्रपट 7 ऑक्टोंबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.
चित्रपटाचा टिझर 22 सेकंदाचा असून या चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावता येत नाही. कतरीना तिच्या चाहत्यांना घाबरवण्यासाठी येत असल्याचे चित्रपटाच्या टीझर वरून समोर येत आहे. म्हणून आता कतरिना स्री भूताची भूमिका करणार असल्याची चर्चा किंवा अंदाज हाच चाहत्यांकडून लावला जात आहे.