महंत वाकोजीबुवा यांच्या जोगवा विधीनंतर नवराञोत्सवाची सांगता पूर्ण.
उस्मानाबाद (सचिन ठेले )
श्रीतुळजाभवानी मातेच्या अश्विनी पोर्णिमेदिनी राञी मानाचा छबिना सोमवार दि१० रोजी काढल्यानंतर देविचे मुख्य महंत वाकोजीबुवा यांनी देवी मंदीरात जोगावा मागितल्या नंतर अश्विनीपोर्णिमे चा धार्मिक विधीचा सांगता झाला,
सोमवारी राञी सोलापूर च्या काठ्यांन समावेत अश्विनीपोर्णिमे चा मानाचा छबिन्या वाहनावर काढला याचा समोर सोलापूर च्या शिवलाड समाजाच्या काठ्या घेण्यात आल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत आईराजाउदो सदानंदीचाउदोउदो व संभळाचा कडकडाटात छबिना काढण्यात आला .
नंतर देविचे महंत वाकोजीबुवा यांनी मंदिर प्रांगणात अंबाबाईचा जोगवा या नावाने आपल्या उपरण्याची झोळी करुन जोगवा मागितला यावेळी उपस्थितीत विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी योगेश खैरमाटे विश्वस्त तथा तहसिलदार सौदागर तांदळे मंदीराच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार सौदागर तांदळे धार्मिकसहाय्यकव्यवस्थापक विश्वास कदम जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे सह भाविक कर्मचारी मानकरी सेवेकरी उपस्थितीत होते.