अग्निपथ योजनेने एका २२ वर्षीय तरुणाचे घेतले प्राण, त्याची लष्करात भरती होण्याची धडपड कायमची थांबली.
अग्नी पथ भरतीने घेतला पहिला जीव !
देश सेवेसाठी भरती होण्याचे स्वप्न अनेक तरुणांचं असतं. त्यासाठी ग्रामीण भागातील मुलं खूप आधीपासूनच प्रयत्न करत असतात. सराव करणे असेल, अभ्यास करणे असेल या सगळ्यांमधून त्यांची जी ओढ आहे भरती होण्याची ती पाहायला मिळते. मात्र केंद्र सरकारने याच सैन्य दलाच्या भरतीबाबत एक नवीन योजना सुरू केली आहे. ती म्हणजे अग्निपथ !
अग्निपथ भरतीच्या योजनेला सुरुवातीच्या काळात अनेक वेळा विरोध झाला, मात्र केंद्र सरकारने ही योजना अखेर लागू केली. काही ठिकाणी या योजना अंतर्गत भरती देखील सुरू झाली आहे. अग्निपथ योजनेत भरती होणारे जे तरुण असतील त्यांना अग्निवीर म्हणून संबोधले जाणार आहे.
अग्निपथ भरती मध्ये बिहार आणि यूपीमध्ये गोंधळ पाहायला मिळतोय. बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले, तर एकीकडे मराठवाडा मध्ये भरती सुरू ही झाली. अनेक जण अग्निवीरच्या भरतीमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतात.
मात्र एक धक्कादायक घटना औरंगाबाद मधून समोर येत आहे. या जिल्ह्यात अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य दलाची अग्नी विर भरती सुरू होती. यासाठी कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील 21 वर्षे करण नामदेव पवार हा देखील भरतीसाठी गेला होता. मैदानाचा फेरा पूर्ण करण्यासाठी अवघे 5 फुटाचा अंतर शिल्लक असतानाच करण अचानक मैदानात कोसळला. त्यानंतर त्याला लगेच शासकीय रुग्णालयात दाखल केलं.
घाटी या ठिकाणी त्याच्यावरती उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. वयात आलेला आपला मुलगा एका स्वप्नासाठी धडपडत असताना अचानकपणे असा मृत्युमुखी पडल्यानंतर कुटुंबीयांवरती दुःखाचा डोंगर कोसळला. अग्नीवीर भरती प्रक्रिया सुरू असताना चाचणीच्या दरम्यान या तरुणाला त्रास होऊ लागला आणि त्यातूनच हा प्रकार घडला.