कृषी वार्ता : शेतकऱ्याची चेष्टा, शेतमालाची पट्टी आली फक्त ” एवढे रुपये ” पहा बातमी सविस्तर.

शेतकरी आपल्या जीवाचं रान करून आपली शेती पिकवत असतात, पिकवत असताना त्यांना बरेचसे समस्यांना तोंड देखील द्यायचं असतं त्यातच जर सांगायचं झालं तर ऊन वारा पाऊस पाणी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पुन्हा त्या शेतीसाठी लागणारे औषध फवारणी बीबीयानं ती शेती करण्यासाठी लागणारी साधनसामग्री या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर उभी राहते. ती शेती राहते ते पीक त्यासाठी लागतो अवाढव्य खर्च आणि एवढा खर्च करून पण जर हातात दमडी राहत नसेल, तर अशा वेळेस शेतकरी करणार तरी काय अशीच एक घटना मांडवगण फराटा येथे घडली आहे.
या गावातील शेतकरी किसन फराटे यांनी खूप अपेक्षेने फ्लॉवरची लागवड केली. यासाठी लागणारे खते औषधे देत पीक जोमदारपणे उभा केले. आणि ते तोडणी केल्यानंतर नवी मुंबई येथे विक्रीसाठी पाठवण्यात आले. आधीच शेतकरी शेतमालाला बाजार भाव नसल्याने मेटाकोटीला येत असतो .शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील फुलगोबी फ्लॉवर उत्पादक शेतकरी याच्या हाती अवघे नऊ रुपये साडेनऊ रुपयांची पट्टी आली आहे. शेतकऱ्याने स्वतःच्या खात्याचा साडेनऊ रुपयांचा चेक बाजार समितीतील व्यापाऱ्याला दिला. शेती करायची कशी असा प्रश्नही त्या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला. शिरूर तालुक्यातील पूर्व भागात तरकारी उत्पादक शेतकरी फळभाज्या व फुलराजा मोठ्या प्रमाणावर पिकवले जातात व यावरच त्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालत असतो सदरील भागामध्ये मिरची, भेंडी, वांगी ,फ्लोअर ,टोमॅटो, कोबी इत्यादी पिके मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जातात. यातच सर्व खर्च वजा जाता जर फक्त साडेनऊ रुपये पट्टी येत असेल, तर याने नक्कीच शेतकऱ्याची मोठी निराशा होत असते.
कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत पुणे, मुंबई, सुरत आधी ठिकाणी रोजच्या रोज पाठवली जातात. या ठिकाणी लिलाव पद्धतीने शेतकऱ्याच्या मालाची खरेदी होते. मात्र यामध्ये अतिरिक्त खर्चाचा बोजा वाहतूक भाडे हे शेतकऱ्यांच्याच माती मारले जातात भांडण होऊन येथील शेतकऱ्याने मोठ्या आशेने फ्लॉवरची लागवड केली होती कधी आणि औषधे पीक देखील जोरदार उभा केलं होतं. तोडणी केल्यानंतर त्यांनी ते नवी मुंबई येथील विक्रीसाठी फ्लॉवर पाठवले होते, यासाठी सर्व खर्च वजा जाता हातात अवघे नऊ रुपये 50 पैसे इतकी पट्टी लागली यामुळे तो शेतकरी निराश झाला.

फ्लॉवरला चांगला बाजार भाव मिळेल म्हणून या पिकाची लागवड केली होती. मात्र ही अशा फ्लॉवर उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही, संपूर्ण पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. तसेच संबंधित व्यापाऱ्यांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतमालक फसवणूक होत राहिली तर भविष्यात शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.