कृषी वार्ता : देखावा करायला नेते आले आणि खालीहात तसेच गेले, शेतकरी मात्र..

बळीराजा सुखी भवं ! असं म्हटलं जातं मात्र हाच बळीराजा एखाद्या नैसर्गिक संकट आलं की तो मेटाकुटीला येतो, नैसर्गिक संकटाचा पहिला फटका हा बळीराजाला बसतो . तो आर्थिक संकटात सापडतो मात्र त्याचे त्याच्या समोर अनेक आव्हानं उभी असतात.
यंदाच्या वर्षी विदर्भात पावसाने थैमान घातला, मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला. सर्व पीक वाहून गेलं, शेतात पाणी शिरल्यानंतर उभा पिकाची नासाडी झाली. काही ठिकाणी पीक वाहून गेलं. तर काही ठिकाणी कोलमडून देखील गेले. काही नेतेमंडळींनी दौरे काढले. तुम्हाला मदत करू, पाहाणी दौरे केले. नुकसान काय झाले? त्याची चौकशी केली मात्र प्रत्यक्षात नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालीच नाही. नुकसान भरपाईचा पत्ताच नाही, त्यामुळे आणखी किती दौरे करणार साहेब मदत द्या असा संतप्त सवाल बेहाल झालेले शेतकरी उपस्थित करत आहेत.
जुलै महिन्यातील अतिवृष्टीने पिकांना मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, नुकसानभरपाईचे पाहणे उपमुख्यमंत्री ,कृषिमंत्री, विरोधी पक्ष नेते , केंद्रीय समिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे शिष्टमंडळ यांनी या ठिकाणी दौरे केले. दौरे झाले मात्र मदत काही झाले नाही. सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांचे अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुले शेतात पाणी गेल्याने पिके खरडून गेली. या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला होत.त्यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
हवालदिल शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे, माजी पालकमंत्री सुनील केदार आदी नेते येऊन गेले’.मात्र मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कमालीचा रोष व्यक्त केला आता आश्वासन नको आर्थिक मदत पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणतात . अनेक भागात पावसामुळे बांध फुटले होते, त्यामुळे पिकांचे नुकसान झालं. सदर पावसाने नुकसान होते त्या ठिकाणी ते 30 टक्के नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. एकही बाधित शेतकरी हा मदतीपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन कृषिमंत्र्यांनी यंत्रणेला दिले. मात्र ही मदत शेतकऱ्यांच्या दारापर्यंत ,बांधापर्यंत कधी पोहोचले हे पाहणे फार महत्त्वाच आहे.