अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बस बहुद्देशीय संस्था यांच्या कडून मानवतेच दर्शन घडलं..

चालक-मालक लोकांसाठी सुरू केलेली अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बस बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी आज सामाजिक उत्तरदायित्व म्हणत अत्यंत चांगला असं काम करण्यात केलं, खऱ्या अर्थाने प्रवाशांची सेवा करणे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ने आण करण ही महत्त्वाची जबाबदारी ही संस्था पार पाडते, यामध्ये अनेक प्रतिष्ठित लक्झरी आणि स्कूलबस मालक सहभागी आहेत , दळण वळण आपली जबाबदारी एवढीच नाही तरी यापुढे जाऊन आपण समाजाचं काही तरी देणं लागतो याच भावनेतून आज या संस्थेने अत्यंत स्तुत्य असा उपक्रम केला, नांदेड येथील चालक हे आपल्या शहरात ऍडमिट आहे ही माहिती मिळताच, ही संस्था मदतीला धावून गेली.
कधी कोणावर संकट येईल हे सांगता येत नाही ,आणि जर हे संकट आरोग्याचं आलं तर हे अत्यंत भयाव असत मात्र यात मदतीचा आधार देणारा आणि आपल्याला हातभार लावणारा खऱ्या अर्थाने देवदूतच ठरतो अशीच महत्त्वाची भूमिका अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बस बहुउद्देशीय संस्थेने घेतली होती आपल्या सहकाऱ्याला मदत करण्यासाठी या संस्थेचे सभासद आणि पदाधिकारी थेट रुग्णालयात पोहोचले रुग्णालयात गेल्यानंतर या सहकारी रुग्णाची संपूर्ण व्यथा ऐकून घेतले आढाव्या असं बिल आल्यामुळे ते हतबल झाले होते,
नेमक काय घडलं …

लक्झरी व स्कूल बस बहुउद्देशीय संस्था. अहिल्यानगर आज दिनांक 26/07/25 रोजी पॅसिफिक हॉस्पिटल या ठिकाणी भेट देऊन नांदेड येथील शर्मा ट्रॅव्हल्स यांचे ड्रायव्हर चे नाव सतीश संग्राम काळे वय 34 क्लिनर चे नाव शंकर विठ्ठल चव्हाण वय 30 राहणार नांदेड यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांचे अपघाता चे हॉल्पिटल बील 76800/ एवढे झाले असताना अहिल्यानगर येथील लक्झरी व स्कूल बस बहुउद्देशीय संस्था यांच्या अध्यक्ष व उपअध्यक्ष सर्व पद अधिकारी यांनी डॉ जाधव यांना विनंती करून बिल फक्त 10000/ एवढे भरून डिस्चार्ज केला.
अहिल्यानगर लक्झरीवर स्कूल बस बहुउद्देशीय संस्थेने त्यांना मदतीचा हात दिला रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले, यावेळी संस्थेच्या अध्यक्ष श्री शिवाजी उबाळे, .उपअध्यक्ष प्रमोद बेदमुथा. उपाध्यक्ष अमोल भांड सचिव रियाज मुलांनी. बाकी सर्व पदाधिकारी गणेश गायकवाड. सर्वर कुरेशी. धर्मा वाघस्कर. अमित साळवे सोमनाथ बळी , श्री जनार्दन व प्रसिद्धी प्रमुख प्रियांका पाटील शेळके या सर्वांचे सहकार्य लाभले.