अहमदनगरचे नाव बदलणार ? गोपिचंद पडळकर

अहमदनगर शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या दरम्यान अहमदनगर नावावरून खूप वेळेस वाद-विवाद देखील झालेले दिसले आहेत. आणि त्यातच आता एक वृत्त हाती आले आहे. अहमदनगर च्या नावावरून आधीच गोंधळ होत असताना अहमदनगरच्या नावाबाबत नेते गोपीचंद यांनी नाव बदलाबाबत मोठे वक्तव्य केलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अहमदनगरच्या नावाच्या नामांतरणची मागणी केली आहे.
अहमदनगर चे नाव बदलून आता अहिल्यानगर करा असे गोपीचंद पडळकर म्हणत आहेत. जर आपण हे नाव बदलले तरच आपण स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध होईल आणि होळकरशाहीचा सन्मान केला याचा असा अर्थ होईल. तुमच्याकडून हि अपेक्षा आहे. या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती मध्ये शरद पवार आणि रोहित पवार यांच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा चुकीचा वापर करून, अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनाला जाण्यापासून रोखलं होतं. पवार कुटुंब हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई मधील बॉम्बस्फोट सूत्रधार असणारा दाऊद इब्राहिम याच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार असणारे नवाब मलिक यांचे पालन करते शरद पवार आहेत. शरद पवार यांना हिंदु राजमाता यांची जयंती म्हणजे आपला पुतण्या रोहित पवार यांना लॉन्च करण्याचा इव्हेंटसच आहे का ? अशी टीका पडळकरांनी केली.
अहमदनगरच्या नाव बदलावरून आधीच वेगवेगळे वाद होताना आपण पाहिले आहेत, आणि त्यातच पडळकर यांनी ही मागणी करत आणखी यामध्ये भर पडली आहे. तर आता पाहूया मुख्यमंत्री ठाकरे यावर काय निर्णय देतात.