शिंदे – फडणवीस सरकार मध्ये अजित पवारांना लागली लॉटरी !

आपल्या स्पष्ट वक्तव्यामुळे बहुचर्चित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दलची ही महत्त्वाची बातमी,अनेकदा अजित दादा त्यांच्या वक्तव्यामुळे ते अनेकदा वादाच्या भवरातही अडकले आहेत.अनेकदा भर सभेतही हास्यकल्लोळ माजला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाची आणि बोलण्याची स्वतःची अशी खास शैली आहे, अगदी कमी शब्दात आणि थोडक्यात जे मांडायचे ते स्पष्टपणे मांडणारं दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या बोलण्यातला रांगडीपणा हा प्रत्येकाला भावतो त्यांच्या या रांगडी बोलण्यामुळे ते जनतेला आपलेसे वाटतात. दादा हे आपल्यातलाच एक जण आहे असं प्रत्येकाला भासत असत. आणि त्यामुळेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेच आपल्याला विरोधी पक्ष नेते हवेत म्हणून ते चर्चेत होते. त्यांना पहिली पसंती होती आणि अखेर त्यांच्याच बद्दलची ही महत्त्वाची बातमी. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी मा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली त्यानंतर अजित दादा पवार यांनी विरोधी पक्षनेत्याचा पदभार देखील स्वीकारला.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे गट आणि फडणवीस यांची युतीचे सरकारआलं. या सरकारला बहुमत चाचणीमध्ये देखील यश मिळालं. त्यानंतर हे सरकार भक्कमपणे उभा राहिला. सेनेतून बंडखोरी केल्यानंतर काही आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत दौऱ्यावरती गेले आणि त्यानंतर संपूर्ण दहा दिवस नाट्यमय घडामोडी झाल्या आणि त्यातूनच दहाव्या दिवशी शिंदे गट आणि फडणवीस यांचे सरकार स्थापन झालं. सर्वात मोठा फटका महाविकास आघाडीत घटकांना बसला. माविआ च सरकार कोलमडलं यातूनच विरोधक म्हणून महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे उभे राहिले आणि याच विरोधी गटातला विरोधी पक्ष नेता हे पद अजितदादा पवार यांच्याकडे आला आहे.
राष्ट्रवादीकडून अजित दादा पवार यांचे नाव निश्चित करण्यात आल होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित दादा यांच्या नावावर विरोधी पक्षनेता म्हणून शिक्कामोर्तब केला. निवड जाहीर होतास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित दादा यांच्या सभागृहात जाऊन त्यांचा अभिनंदन केल. त्यानंतर सर्वच नेत्यांनी अजित दादा पवार यांचा अभिनंदन केल. येत्या काळामध्ये मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून दमदार काम राहिल. जनतेचे प्रश्न ते सरकार पुढे निर्भीडपणे आणि स्पष्टपणे मांडतील आणि याचा जनतेला फायदा होईल असे आशा व्यक्त करूया.