आत्ताची बातमीव्हाईट कॉलर

सर्व नेत्यांची ” सिल्व्हर ओक ” येथे या विषयासाठी होत आहे बैठक.

राज्यपाल कोरोना सारख्या आजारापासून बरे होऊन आता राजभवनामध्ये आले आहेत. त्यामुळे ज्या काही राजकारणातल्या घडामोडी होत्या त्या घडामोडींनी वेग धरला आहे. विधानपरिषद निवडणूक संपते काय, आणि राजकीय नेते रातोरात रस्ते बदलतात काय, यामध्ये शिवसेनेमध्ये मोठी फूट पडलेली आपण सगळ्यांनी पाहिली. व आता पर्यायाने सरकार देखील पडू शकते हे स्पष्ट झाले. आणि तसे पहिले तर मागील आठ दिवसापासून भाजपच्या गोटातील हालचाली सुद्धा वाढले आहेत. त्यामुळे फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनू शकतात असे चित्र स्पष्ट समोर आले.

गेल्या काही दिवसापासून घडामोडी वायुवेगाने वाढल्या आहेत. सध्याचे सत्ताधारी व विरोधकांच्या हालचालींना वेग आला आहे. यामध्ये राज्यपाल भगतसिंग कुशारी यांनी उडी घेतली असून महा विकास आघाडी सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी त्याचप्रमाणे भाजप व शिंदे यांचे बंड आमदार या सगळ्यांनी मिळून राज्य सरकारला कात्रीत धरले आहे असं दिसतंय. यामध्ये जी फडणवीसांची खेळी केली होती ती आता कुठेतरी यशस्वी होतं असताना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते. त्यामुळे की काय पण आता सगळे महा विकास आघाडीचे नेते हे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक वर दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या घरी राष्ट्रवादी शिवसेना व काँग्रेसच्या नेत्यांची बैठक देखील चालू झाली आहे.

भाजपने जी काही खेळ केली आहे, जे काय डावपेच खेळले आहेत यावर पवारांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राजभवनात पाठवण्यात आले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तापालट होणारी स्पष्ट झालं आहे. त्याचप्रमाणे त्यासाठी जे आवश्यक कायदेशीर पेच अद्याप पर्यंत सुटलेला नाही. त्याचप्रमाणे राज्यपालांनी सरकारला वेळ न देता एका दिवसात अधिवेशन घेण्याचा आदेश दिला आहे. तसेच बहुमत सिद्ध करण्यास सांगितला आहे. या विरोधात सेनेचे वकील पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेले असून राज्यपालांनी घटनेच्या नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर केला गेला आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष घटनात्मक व कायदेशीर पेच वाढत चालले आहेत. एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाने वेगळा गट स्थापन केल्याची कोणतीही अधिकृत घोषणा देखील त्यांनी अजून पर्यंत केलेली नाही आम्ही शिवसेनेतच आहे त्यांनी जाहीरपणे सरकारचा पाठिंबा काढला नाही. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होत आहे तर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याची घोषणा कोणत्या आधारावर केली ? असा प्रश्न विचारत आहेत याच प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दुपारच्या तीन वाजेपर्यंत कोर्टाने कागदपत्रे जमा करण्यासाठी सांगितले असून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या प्रकरणातली सुनावणी केली जाणार आहे. यामध्ये शिवसेनेकडुन निर्णय लागल्यास राज्यपालांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जाईल. कोर्टाचे आदेश आहेत ते राज्यपालांना बंधनकारक असतात. प्रत्यक्षरीत्या भाजपला दणका बसेल हे सगळं चालू असताना आपल्या या गोष्टीचा देखील एक आढावा पाहायचा आहे की, यामध्ये शिंदे गट यांचा समर्थन घेऊन भाजप महाराष्ट्रामध्ये सत्ता आणणार आहे की काय व कायदेशीर प्रकरणामुळे बहुमत चाचणी पार पाडणार आहे की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिला आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे जी शिवसेना अडचणीमध्ये सापडली आहे. आणि आता शिवसेनाही जवळजवळ सत्तेपासून पायउतार होण्याच्या मार्गावर आपल्याला दिसत आहे. पण तरीही कसलीही हार न मानता त्यांनी शरद पवार यांच्याकडे सल्ला मसलत करण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी जाऊन एक बैठक घेत आहेत. सध्या शरद पवार यांच्या घरी सर्व नेत्यांची खलबत् सुरू आहेत. सध्या महाविकास आघाडी सरकारकडे बहुमत नसल्याने सत्ता सोडल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. मात्र आमदारांचे निलंबन, बहुमत चाचणी विषय राज्यपालांचे जे आदेश व पक्षांतर बंदी कायद्याची समीकरणे यामध्ये खरी मेक आहे. पवार यांच्याकडून महाविकास आघाडीचे नेते अपेक्षा लावून बसले आहेत की, शरद पवार हेच या राजकारणामध्ये काहीतरी बदल घडवून आणू शकतात. शरद पवार यांनी सूत्र हाती घेतलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापासूनही शरद पवार यांनी अडवणूक केलेली आहे.

सरकार प्रक्रिया आणखी सात दिवस पुढे गेली, 2019 मध्ये राष्ट्रवादीतील अजित पवार यांनी जो बंड केला होता, त्यावेळेस राष्ट्रवादीचा तो बंड पवारांनी पुढाकार घेऊन हाणून पाडला होता आणि अजित पवार यांना माघारी वळवलं होतं. आता राज्यात महाविकासआघाडी ही पवार कोणता करिश्मा करतील याकडे सर्व जण डोळे लावून बसलेले आहेत. यामध्ये आपल्याला एक ट्विट देखील पाहायला भेटले आहे की, वर्षा सोडलं, मुख्यमंत्रिपद सोडलं, पण पवारांना सोडत नाही. असा मार्मिक टोला देखील बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लावला आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!