शिक्षण मंत्र्यांनी दिली मोठी माहिती या तारखेपासून सुरू होणार राज्यातील सर्व शाळा.

राज्यातील शाळा सुरू कधी करायची याबाबतची बैठक आज शिक्षणमंत्री यांच्या सोबत घेण्यात आली त्यावेळी शिक्षण मंत्री गायकवाड यांनी शाळा सुरू होण्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी दिली.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड काय म्हणाल्या आहेत ते पाहू,
फक्त इयत्ता पहिलीची शाळा १३ जून तारखेपासून चालू होणार हे पहिलीच्या शाळांसाठी असणारे पहिले पाऊल असेल व अन्य शाळा 15 जून पासून सुरू करायचा निर्णय वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे.
तसेच राज्यात सध्या मास बंदी कुठेही नाही पण येणाऱ्या काळामध्ये कोरोना परिस्थिती काय असेल त्यावर शाळेचा पुढचा निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील शाळा पुन्हा बंद होणार का ??
याबाबत विचारणा केली असता शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या की, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोरोनाची परिस्थिती काय असेल यावर शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना जेव्हा बारावीचा निकाल संदर्भात विचारले त्यावेळेस त्यांनी इतर कुठलेही उत्तर न देता फक्त बारावीचा निकाल लवकरात लवकर लावला जाईल असे सांगितले.