अंत्यसंस्कारावेळी मुलीने जे केले ते पाहून सर्व गावकरी अवाक झाले, पहा बातमी सविस्तर.

सोयगाव, दि.२१ ( प्रतिनिधी)
आपल्याकडे असं म्हटलं जातं की, मेल्यानंतर आपल्या वारसाच्या हाताने म्हणजेच लेकाच्या हाताने पाणी पाजलं पाहिजे आणि त्यासोबत असं पण म्हटलं जातं की, खांदा देण्यासाठी मुलगाच हवा. ही आपली रूढी परंपरा गेल्या कित्येक दिवसापासून चालत आली आहे. मुलींना नेहमीच दुय्यम स्थान असतं कारण गेल्या कित्येक दिवसापासून या चालीरीती अशा पद्धतीने चालत आल्या आहेत. मुलगा म्हणजे आपलं आपल्या घराचा वारसा असतो, मुलगा म्हणजे आपल्या घराचा वंश असतो आणि आपला वंश देखील आपल्या मुलामुळेच पुढे जाऊ शकतो असं बऱ्याचदा म्हणताना आपण देखील ऐकलं असेल.
अगदी अंत्यसंस्काराच्या वेळी सुद्धा मुलाला पुढाकार देऊन मुलींना मागे ढकले जाते मात्र या घटनेचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे.या बातमी मध्ये एका मुलीने आपल्या पित्यासाठी जे काही केले आहे ते पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. चक्क या बातमीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की आपल्या वडिलांना मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मुलीने पाणी पाजला आहे.
हे सगळं करत असताना त्या मुलीने रुढी परंपरा रितीरिवाज या कसल्याही गोष्टींचा विचार न करता, तिच्या वडिलांसाठी ती एक मुलगा म्हणूनच, स्वतःला मुलगा समजूनच सगळ्या विधी पार पाडल्या तर हे पाहून आत्ताच्या पिढीला नक्कीच अभिमान वाटेल. आपण म्हणतो कि बदल झाला पाहिजे असा बदल होत असेल तर तो बदल नक्कीच सगळ्यांना आवडेल असा बदल हा आहे याबाबत पाहूया सविस्तर बातमी काय आहे.
भुसावळ येथील जुना जळगाव रोडवर असलेल्या भिरुड कॉलनीत दि.२१ रविवार रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान पंढरी ओंकार बोखारे-पाटील यांचे वृद्धपकाळात वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. पंढरी बोखारे-पाटील यांना एकच मुलगी निलीमा सुनील पाटील हिने बापाची सेवा केली. मुलाची उणीव भासू दिली नाही. धर्म शास्त्र नुसार आई वडील यांच्या निधनानंतर मुलगा मुख अग्नी देतो. असे असले तरी २१ व्या शतकातील परिवर्णवादी विचारांच्या निलीमाताई ने वडिलांच्या निधनानंतर अग्नी देण्याचा निर्णय घेतला.
निलीमाताईच्या निर्णयाचे समाज बांधवांनी कौतुक केले. निलीमाताई व त्यांचे पती सुनिल माणिक पाटील हे दोघे पती, पत्नी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. सुनिल पाटील छत्रपती क्रांती सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आहे. पाटील कुतुबात शाहू,फुले, आंबेडकर विचारांचा पगडा असून हे कुटूंब समाज सेवा हेच आपले कर्तव्य समजत असतात. निलीमाताईंच्या धाडसाचे महिलान मध्ये सर्वत्र कौतुक होताना दिसले. महिला ही सर्वच क्षेत्रात सक्षम असल्याचा हा पुरावा आहे.ते योगेश बोखारे-पाटील,संजय बोखारे-पाटील यांचे काका होते.