पुष्पा चित्रपटाच्या विरोधात अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल. हे आहे कारण.
आपल्या सगळ्यांचा आवडता अल्लू अर्जून याचा काही दिवसापूर्वी पुष्पा द राईस हा चित्रपट आला होता. आणि या चित्रपटाने सर्वांना वेड लावलं होतं या चित्रपटातील गाण्यांवर कित्येकांनी ठेका धरला. पुष्पा अर्थात अल्लू अर्जुन याची बरेचसे डायलॉग अनेकांच्या तोंडी आपल्याला ऐकण्यात मिळाले.त्याच्या चित्रपटामध्ये भारदस्त आवाजामध्ये ‘झुकेगा नही साला’ हा डायलॉग तर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला होता. असा डायलॉग म्हणणारा पुष्पा एका प्रकरणात चांगलाच अडचणीत आलाय.
एका शैक्षणिक संस्थेचा समर्थन करणारी जाहिरात अल्लू अर्जुनच्या अंगलट आली आहे. आयआयटी व नीट Rankers माहिती देणाऱ्या श्री चैतन्य शैक्षणिक संस्थेची जाहिरात दिली होती. ही जाहिरात दिशाभूल करणारी असून यातून समाजाला चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते उपेंद्र रेड्डी यांनी केला आहे. समाजाची दिशाभूल करून खोटी जाहिरात केले आहे असा आरोप लावत अर्जुन अल्लू अर्जुन याच्याविरोधात व संबंधित शैक्षणिक संस्थेच्या विरोधामध्ये उपेंद्र रेड्डी यांनी अंबरपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली आहे. अल्लू अर्जुन व त्या संबंधित शैक्षणिक संस्थेवर खटला चालवावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
आपला सगळ्यांचा चाहता / सगळ्यांना आवडणारा अल्लू अर्जुन याआधी देखील खूप वेळेस असाच अडकला आहे. याआधीही त्याने एका फूड डिलिव्हरी ॲप मार्केटिंग सेवेची जाहिरात केली होती आणि त्यानंतर आपल्या पुष्पावर भरपूर प्रमाणात टीका झाली होती. सरकारी सेवेतील वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याऐवजी तो एका खासगी वाहतूक सेवेची प्रशंसा केली विरोधात नेटकर्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केलेली सुद्धा होती.
आपण पाहतो जाहिरातींचे काम करत असताना खूप वेळेस अनेक चुकीचा संदेश देण्याचे काम केले आहे म्हणून अनेक अभिनेत्याने वर किंवा खेळाडूंवर टीका झालेली आहे. आणि त्यांच्यावर तक्रार देखील केलेली आहे मध्यंतरी अभिनेता अक्षय कुमार यांच्यावरही गुटख्याची जाहिरात केल्यामुळे प्रकरणी जोरदार टीका झाली होती. आणि या टीकेनंतर अक्षयने या जाहिरातीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
आपला आवडता पुष्पा म्हणजे अल्लू अर्जुन चा चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाला आणि त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद देखील दिला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला मोठी कमाई सुद्धा मिळाली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुन लवकर त्याच्या पुढच्या ‘पुष्पा द रूल’ या चित्रपटाच्या तयारीला देखील लागणार आहे लवकरच या चित्रपटाचे शूटिंग चालू होणार आहे असे समजते.