झाडी,डोंगर अन हॉटेल जरी ओके असल तरी, या आमदारच छत मात्र ओके नाही

काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, एकदम ओके सगळं !! या वाक्याचे जे जनक आहेत ते म्हणजेच बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील. यांच्यासोबत अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात ते वास्तवास होते.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली होती. आणि याचा सर्वात मोठा धक्का हा शिवसेनेला बसला होता. या घटनेमुळे शिवसेनेला मोठी खिंडार देखील पडली. त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची देखील वेळ उडवली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सांगोले से आमदार शहाजी बापू पाटील हे सुरत गुहाटी आणि गोवा या ठिकाणी या बंडखोर आमदारांमध्ये होते आणि त्याच काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत ते त्या ठिकाणी उपस्थित असताना असे त्यांचा एक डायलॉग सुपर डुपर हिट ठरला. त्यावरती अनेक गाणे आली आणि सोशल मीडिया वरती व्हायरल झाले. त्यांचा हा डायलॉग फेमस झाल्यानंतर त्यांना खुद्द एकनाथ शिंदे यांनी देखील तो डायलॉग म्हणायला लावला होता. त्या डायलॉग मुळे संपूर्ण राज्यात सांगोल्याचे हे बंडखोर आमदार फेमस झाले आणि तेच आमदार ज्या ठिकाणी आमदार निवास मध्ये वास्तव्य करत होते त्या रूमच्या छताचा काही भाग कोसळल्याचे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली रूम मधील बेड वरती सिलिंगचा मोठा भाग पडल्याच समोर आलं. आणि याचा फोटो देखील समोर येतोय मुंबईतील या घटनेनंतर शहाजी बापू यांची प्रतिक्रिया अध्यापही मिळाली नाहीये. मात्र ते सुरक्षित आहेत असे सांगितले जाते असे म्हणतात की सुदैवानं ते थोडक्यात वाचले.
मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास येथील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. झाडी डोंगर आणि हॉटेल जरी ओके असलं तरी आमदार निवासांचं जी रूम आहे ती मात्र ओके नाहीये हे आपल्याला पाहायला मिळते. सुदैवानं बंडखोर आमदार शहाजी भाऊ पाटील हे थोडक्यात वाचलेले आहेत. सांगोलात परतल्यानंतर शहाजी बापू त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलं त्यावेळी जनतेला त्यांनी संबंधित करत बंडखोरी का केली हे देखील सांगितलं. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असलेली चौकटी ही संजय राऊत यांच्या चौकटीमुळे असं म्हणत संजय राऊत यांना निशाणा केला आणि राजकारणामध्ये ते सध्या बहुचर्चित असे आमदार म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले आहेत. मात्र त्यांच्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची बातमी सुदैवाने ते याच्यामध्ये वाचलेले आहेत त्यांना दीर्घायुष्य लाभो असेच आपण म्हणूया