नवऱ्यासाठी बायकोने केली अशी जाहिरात, सोशल मिडीयावर होत आहे व्हायरल. पहा काय आहे जाहिरात.

दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो की, बायको आपल्या नवऱ्या बद्दल जरा जास्तच संवेदनशील असते. आपला नवरा हा कुठल्या पर स्त्री बरोबर बोललेल तिला कधी आवडत नाही. किंवा कोणती स्त्री आपल्या नवऱ्या सोबत बोलत असेल तर तेही तिला पटत नाही. आपल्या नवऱ्यासाठी संपूर्ण जे काही असेल ते फक्त त्याची बायको असावी असं तिला वाटत असतं. आपल्या नवऱ्याच्या जवळपास कोणत्याही पर स्त्रीला फिरकूही देत नाही.
पण बरेचदा आपण पाहतो की, नवरा किंवा बायको यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे लग्नाचं नातं तुटते अश्या बर्याच घटना घडलेल्या आहेत. आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात किंवा आपल्या बायकोच्या आयुष्यात तिसरा कोणीतरी आला आहे, हे कोणत्याही बायकोला किंवा नवऱ्याला पटणार नाही. पण या बातमीमध्ये काही वेगळे घडले आहे. हि बातमी चक्क एका बायकोने आपल्या नवऱ्यासाठी घरात दुसरी गर्लफ्रेंड आणल्याची घटना घडत आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या नवऱ्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंड बाबतचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
नवरा आणि बायको या दोघांच्या नात्यांमध्ये जर विश्वास नसेल तर ते नातं टिकू शकत नाही. एकदा विश्वासाला तडा गेला की तो विश्वास पुन्हा रहात नाही. विश्वासला तडा जाण्यासाठी अनेक कारणे असतात. यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरा-बायकोमध्ये नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक लग्न तुटतात. सोशल मीडियावर गाजत असलेल्या एका व्हिडिओमध्ये चक्क बायकोने नवऱ्यासाठी दुसरी गर्लफ्रेंड आणली आहे.
आपल्या नवऱ्याच्या गर्लफ्रेंडसाठी तीन सोशल मीडियावरती जाहिरात देखील दिली होती. आणि या जाहिरातीमध्ये ती म्हणते की, आपल्या नवऱ्यासाठी तीन गर्लफ्रेंड हवे आहेत. जे कोणी उत्सुक असतील त्यांना या मोबदल्यात महिन्याला ३२ हजार रुपये पगार देणार आहे. त्यासोबत या गर्लफ्रेंड्सना नवऱ्याला खुश ठेवण्याबरोबरच घरातल्या कामात देखील मदत करायची आहे. हे देखील त्यांनी तिने या जाहिरातीमध्ये म्हटलं होतं.
44 वर्षाच्या महिलेने तिच्या पतीसाठी ही जाहिरात दिली होती. ही जाहिरात पाहून सध्या एक गर्लफ्रेंड मिळाली आहे. पण अजून दोन पोस्ट रिकाम्या आहेत. एका रिपोर्टनुसार याबाबतचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या जॉब साठी अपलाय करणाऱ्या महिलांनी स्वतःची एचआयव्ही टेस्ट करणे बंधनकारक आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या सोबत गर्लफ्रेंड बनण्यासाठी वयाची अट आहे. ३०-३५ वर्ष दरम्यान असावा. तसेच त्यांच्याकडे हाईस्कूल किंवा पदवी ची डिग्री देखील असली पाहिजे. विनामूल्य या स्त्रिया घरात राहू किंवा खाऊ शकतात. या बाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात व्हायरल झाला आहे.
आणि या मागील कारण विचारले असता आपण डिप्रेशनच्या आजारामुळे हा निर्णय घेत असल्याचं या व्हिडिओमध्ये त्या महिलेने सांगितला आहे.