आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय नाट्याचा थरार गेली चार ते पाच दिवसापासून चालू आहे. शिवसेनेचे विश्वस्त नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सोबतच बंड केला आहे. आणि त्यांच्याकडे तब्बल 39 शिवसेनेचे आमदार आहेत. शिवसेनेमध्ये एकूण 55 आमदार आहेत त्यापैकी 39 हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले आहेत आणि यामुळे शिवसेना व महाविकास आघाडी सरकार हे धोक्यात आला आहे.
शिवसेनेचे वकील बोलताना म्हणतात की, जर शिंदे गटाला कोणत्याही कारवाईपासून वाचायचं असेल तर एखाद्या पक्षांमध्ये विलीनीकरण करावे लागेल नाही तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. पक्षांतर बंदी कारवाई पासून जर त्यांना वाचवायचं असेल तर एकूण संख्यापैकी दोन-तृतीयांश संख्या गटाला आवश्यक असतील. पण तो गट एखाद्या पक्षात विलीनीकरण करावा लागतो हेही तेवढेच खरे आहे. यामध्ये बोलताना ते म्हणतात की बहुमत असतानाही एकनाथ शिंदे यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
जर एकनाथ शिंदे यांच्या गटाला कुठल्याही एखाद्या पक्षाकडे जर जायचं असेल तर तो पक्ष म्हणजे भाजप किंवा प्रहार पक्ष हे दोन पर्याय आहेत. पण या सगळ्यांमध्ये शिंदे गट मनसे पक्षात सामील होणार असल्याचे चर्चेला मध्यंतरी उधाण आले आहे. कारण जसे मनसे शिवसेना मधून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, तसेच शिंदे गट मनसे मध्ये सामील होणार आहे अशी चर्चा सध्या माध्यमांमध्ये पसरू लागल्या आहेत. या संदर्भामध्ये शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी काही स्पष्टीकरण दिले आहे.
“आम्हाला कोणत्याच गटात सामील होण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही शिवसेनेचा भाग आहोत. आमचा हा मूळ शिवसेनेचाच गट आहे पण जे उरलेले १४ आमदार आहेत त्यांनी कोणत्या गटात जायचं ते ठरवावं. आम्हाला कोणत्याच पक्षात जायची गरज नाही आमचा मूळ पक्ष हा शिवसेनाच आहे. उरलेल्या १४ लोकांनीही आमच्याच गटात यावं, कारण आम्ही सगळे शिवसेनेला मानतो, ते आमच्याकडे आले तर त्यांना नक्कीच फायदा होईल.” असं ते म्हणाले.
केसरकर हे ही म्हणतात की, आम्ही शिवसेनेवर नाराज आहोत आणि आम्ही शिवसेनेचाच वेगळा गट तयार करण्यावर ठाम आहे असं ते म्हणाले.