महाराष्ट्रातील एक यशस्वी अभिनेता प्रेम नरसाळे यांची खास मुलाखत.
पुणे प्रतिनिधी मंगेश गांधी
1) तुमचं संपूर्ण नाव.
- माझं नांव प्रेम दत्तात्रय नरसाळे आहे.
2) तुम्ही राहता कुठे.
- मी पुण्यात मार्केट यार्ड येथे राहतो. 3) तुम्ही सिनेमा क्षेत्रात कसे आला.
-मला प्राथमिक शाळेत असल्यापासून आवड होती. मी पुण्यात आल्यावर ऑडिशन दिले आणि माझा सिनेमा क्षेत्रातला प्रवास सुरु झाला.
4) तुमच्या दिवसभराचं कामाचं रुटीन कसं असतं.
-मी सकाळी लवकर उठून जिम ला जातो, त्यानंतर येऊन योग्य असा डाएट घेतो. त्यानंतर थोडासा अभिनयचा थोडासा रियाज आणि मग शूटिंग असेल तर शूटिंग किंवा मीटिंग असेल किंवा इतर त्या दिवसाची ठरलेली काम. असा एकंदरीत रुटीन असतो माझा.
5) या क्षेत्रात आल्यावर तुम्हाला दैनंदिन जीवनात काही अडचणी आल्या का.
-हॊ थोड्याफार प्रमाणात. आपण या क्षेत्रात आलो कि खूप वेळ यासाठी द्यावा लागतो. मग आपल रोजच रुटीन बदलून जात.
6) तुमच्या सिनेमा किंवा सिरीयल ला पुरस्कार मिळाले असेल तर जो आनंद तुम्हाला मिळाला आहे त्याबद्दल काय सांगाल.
-हॊ,’ सुरमा’ या लघुपटासाठी मला उत्कृष्ट अभिनयच पुरस्कार मिळाला. पुरस्कार आपल काम करण्याच बळ वाढवतात. आणि आपल्या कामच कुठेतरी कौतुक होता याचा कोणाला आनंद नाही होणार.
7) तुमचा आवडता अभिनेता व अभिनेत्री कोण आहे व त्यांच्या बद्दल काय सांगाल.
- तसा आवडता अभिनेता म्हणून कोण्या एकाच नाव नाही घेता यायचं काही अभिनेत्यांची नाव सांगतो मला इरफान खान , नसरूउद्दीन शाह, मनोज वाजपेयी, कमल हसन, नाना पाटेकर, जितेंद्र जोशी, धनुष इत्यादी. आणि अभिनेत्री म्हणाल तर शबाना आजमी,कंगना राणावत, आलिया भट या अभिनेत्री च काम आवडत. 8) या क्षेत्रातला तुमचा अविस्मरणीय अनुभव कोणता आहे.
-या क्षेत्रात मी गेली 10 वर्ष काम करतो त्यामुळे असे अनुभव खूपदा आले. माझा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा स्वतः ला मोठया पडद्यावर पाहणं. हा अनुभव खूप अविस्मरणीय होता.
9)तुम्ही या क्षेत्रात आल्यावर तुमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला का असं तुम्हाला वाटतं का.
- अर्थातच, आपल्या देशात सिनेमा क्षेत्राचं खूप आकर्षण आहे. इथं प्रसिद्धी मिळते त्यामुळे सगळ्यांनाच याबद्दल आकर्षण आहे. सुरवातीला मी या क्षेत्रात प्रयत्न करत होतो तेव्हा काही लोकांनी माझी टिंगल ही उडवली, पण नंतर माझा काम थिएटर ला आणि टीव्ही वर पाहिल्यावर तेच लोक माझ्याकडे सन्मानाने पाहू लागले.
10) तुमची सध्या सिनेमा किंवा शॉर्ट फिल्म चे शूटिंग चालू असलेल्या बद्दल काय सांगाल.
- सध्या दोन तीन प्रोजेक्ट वर माझा काम चालू आहे पैकी एक प्रोजेक्ट पुढच्या आठवड्यात म्हणजे 15 मार्च नंतर सुरु होइल आणि बाकीच्या प्रोजेक्ट ची अजून जुळवाजूळव चालू आहे त्यामुळे त्याबद्दल इतक्यात काही सांगणं थोडा अशक्य आहे.
11) सध्या या क्षेत्रात येणाऱ्या पुढच्या पिढी साठी तुमचा संदेश काय असेल.
- मी या क्षेत्रात येणाऱ्यांना माझं कायम एकच सांगणं आहे, कि प्रथम तुम्ही काम शिका, त्यात मास्टर झाला कि तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत.
12) तुम्ही आमच्या न्यूज पोर्टल विषयी आपण काय सांगाल.
- या क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर अभिनेत्याला आपल काम आणि स्वतः ला मार्केटिंग कराव लागत आणि तुमचं न्यूज पोर्टल नेमकं तेच काम अतिशय चांगला करत. तुम्ही असच छान काम करत राहा. तुम्ही मला ही संधी दिलीत त्याबद्दल आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.