….आणि म्हणून तिने लोकलखाली जीव देण्याचा एकदा नाहीतर २ वेळा प्रयत्न केला होता; पहा काय आहे कारण.
अगदी काही दिवसांपूर्वी एका तरुणीने रेल्वेच्या समोर उभे राहून जीव देण्याचा प्रयत्न केला होता. प्रियकर माझ्यासोबत लग्न करत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे अशी माहिती त्यावेळी समोर आली होती. या तरुणीने एकदा नाही तर दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा सखोल तपास केला असता, अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे.
याबाबत मिळालेली माहित अशी आहे कि, प्रेम प्रकरणातून ही तरुणी गर्भवती राहिली होती. मात्र प्रियकर तिच्यासोबत आत्ता लग्न करणारायला तयार नव्हता. त्यामुळे या दोघांमध्ये वाद झाले. ती आपल्या प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावत होती. मात्र तो तिला काही दिवस थांब असं म्हणत होता, ती ऐकायला तयार नव्हती आणि त्यामुळे त्या दोघांचे भांडण झाले, त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
आपण गर्भवती आहोत आणि त्यामुळे आता लग्न केलं पाहिजे असं या प्रियसीला वाटत होतं. मात्र प्रियकराने लगेच लग्नाची तयारी दर्शवत नव्हता. त्यामुळे दोघांच कडाक्याच्या भांडण झालं त्याचा परिणाम तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भायखळा रेल्वे स्थानकात सायंकाळच्या वेळी प्लॅटफॉर्म एक वर लोकल येत असताना त्याच्यासमोर उभे राहून जीव देण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र सानप आणि सुरक्षारक्षक गजानन मुसळे हे पळत आले.
तिला बाजूला केलं त्यानंतर तिने पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती आत्महत्यांचा प्रयत्न केला. प्रियकराशी वाद झाल्यानंतर अशी पहिल्यांदा समज दिली होती. अशी माहिती समजली होती मात्र भायखळा रेल्वे स्थानकाचे उप स्टेशन व्यवस्थापक रमेश सावंत यांनी याबद्दल सांगताना प्रेम प्रकरणातून ती गर्भवती होती आणि प्रियकर आता लग्नाला नकार देत होता म्हणून या दोघांमध्ये वाद होऊन तिने आत्महत्या करण्याचा टोकाचे पाऊल उचललं होतं अशी माहिती मिळाली.