आणि असा झाला लाकूड तोड्याचा मृत्यू….; अन्न न मिळाल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातली घटना.
उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात अन्न न मिळाल्यामुळे आदिवासी लागले मरू
लाकूड तोड्याचा गोष्ट तुम्ही बालपणा पासून ऐकत असाल मात्र आता त्या लाकूड तोड्याचा मृत्य झाला आहे. ते ही उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात घडलं,रमेश प्रेमसिंग उईके महिनाभरापासून भुकेच्या वेदना सहन करीत होते. पोटातील भुकेच्या आगीत त्यांचा सारा देह होरपळून निघाला अन् आज त्याला अखेर मृत्यूने गाठलं.नागपूर येथील सिद्धेश्वर वाडीमध्ये अत्यंत गरीब लोक राहतात त्यांचा उदरनिर्वाह लाकूड तोडणं किंवा मजुरी करणे.
सिद्धेश्वरवाडीतील गोंडवस्तीची ही घटना, या वस्तीतील पुरूषाचा एक धंदा तो म्हणजे लाकूड तोडणे. काहीतरी कारणावरून पोलीस धरून नेतात आणि मारतात म्हणून या भागातील लोकांनी हे का सोडून दुसरा पर्याय शोधला पण सापडला नाही. अशातच हाताला काम नाही म्हणून वस्तीवरच्या कित्येक लोकांवर उपासमारीची वेळ आलीयातूनच साठीतील रमेश प्रेमसिंग उईके महिनाभरापासून भुकेच्या वेदना सहन करीत होते. पोटातील भुकेच्या आगीत त्यांचा सारा देह होरपळून निघाला अन् आज त्याला अखेर मृत्यूने गाठलं.
सारी वस्ती हळहळली. ‘भूक प्यासने रमेश की जान ली’ असे ही वस्ती सांगत होती. हे शब्द कानावर पडताच आपण कोठे आहोत याची क्षणात जाणीव होऊन जाते. रमेश उईके घरातील कर्ता धर्ता असल्याने त्याच्या कुटुंबाला आधारच राहिला नाही. आदिवासींसाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना असताना गरजू आदिवासींपर्यंत पोहचत नाही, आदिवासी विभागाच्या सुस्त कारभारामुळे आदिवासीचा भूकबळी गेल्याचा नातेवाईकांनी आरोप ठेवला आहे.
रमेशला अन्न खान्यासाठी पैसे नव्हते तर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाजवळ पैसे कुठून येणार. बरमा, रामा, सचिन, दाऊ अन् लक्ष्मी सारी लेकरं वडिलांच्या निपचित पडलेल्या देहाकडे नुसतीच बघत होती. त्याचवेळी गोंड वस्तीतील सामाजिक कार्यकर्ते तुफान उईके यांनी साऱ्या वस्तीतील लोकांकडून वर्गणी गोळा गेली. एक दीड हजार रुपयांचा निधी गोळा झाला. यानंतर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.