‘ऐ हात काय दाखवते’ म्हणत दोन महिलांचा राडा, Video होतोय तुफान व्हायरल…
ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही देखील अशाप्रकारची भांडण, हाणामारी पाहिली असेल. ट्रेनमधील भांडण कधी-कधी इतकी टोकाला जातात की, प्रवासी एकमेकांवर हात उचलतात. यावेळी इतर प्रवासी त्यांचे भांडण सोडवण्यासाठी पुढे येतात. ट्रेनमध्ये अनेकदा सीटवर बसण्यावरूनच सर्वाधिक भांडणं होत असतात.
या भांडणाचे नंतर हाणामारीत रुपांतर होते. सध्या सोशल मीडियावर ट्रेनमधील महिलांच्या भांडणाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात दोन्ही महिला सीटवरून एकमेकांशी कचाकचा भांडत आहेत व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन महिला ट्रेनमध्ये एकमेकांशी भांडताना दिसत आहे.
दोन्ही महिला सीटसाठी एकमेकांशी भांडत होत्या, असे सांगितले जात आहे. यात एक वृद्ध महिला सीटवर बसलेल्या दुसर्या महिलेकडे पाहून ”मी इथे बसले होते” म्हणत तिला ढकलून देत तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करते. यावर सीटवर बसलेली महिला चिडते आणि रागाने ‘ये हात काय दाखवते’ असे म्हणते. यानंतर वृद्ध महिला मागे हटत बडबड करत उभी राहते.
यावेळी ट्रेनमध्ये उपस्थित अनेक लोक दोन्ही महिलांना समजावण्याचा प्रयत्न करताना आणि त्यांना शांत होण्यास सांगताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ कुठला आहे, हे सध्या कळू शकलेले नाही. ट्रेनमध्ये सीटवरून भांडण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा असे व्हिडिओ समोर आले आहेत.