कलाशिक्षक श्री. राजेंद्र धस यांच्या स्वखर्चातून गरीब विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य उपक्रम, पहा सविस्तर.

सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक श्री. राजेंद्र धस सर यांच्या स्वखर्चातून शासकीय कला परीक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना ऑइल पेस्टल रंगाचे वाटप करण्यात आले.
कला संचालयामार्फत महाराष्ट्र राज्य ड्रॉईंग ग्रेड परीक्षा प्रत्येक वर्षी सप्टेंबर या महिन्यात आयोजित केली जाते या इलेमेंटरी व इंटरमिजिएट शासकीय परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण होतात त्यांना इयत्ता दहावीच्या निकालामध्ये टक्केवारी वाढवण्यासाठी A-7, B-5, C-3 असे गुण शासकीय प्रमाणपत्रामधून मिळतात.
या प्रमाणपत्राचा उपयोग इंजीनियरिंग व ए.टी.डी. आय.टी.आय. पेंटिंग, कमर्शियल,टेक्स्टाईल, इंटरियर अशा कला क्षेत्रामध्ये या शासकीय प्रमाणपत्राचा टक्केवारी मध्ये वाढ होण्यासाठी उपयोग होतो. म्हणून या कला शिक्षकाने गरीब विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून कंपनीचे 25 शेड असलेल्या ऑइल पेस्टलच्या पेट्यांचे वाटप केले.
शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक श्री रावसाहेब सातपुते सर, कलाशिक्षक श्री.राजेंद्र धस सर,बारस्कर सर, आव्हाड सर,गावडे सर, सोनवणे सर, श्रीमती. तीपुळे मॅडम, भोगे मॅडम,गाडेकर मॅडम, महाडुळे मॅडम, कुदळ मॅडम, नेहुल मॅडम, फुंदे मॅडम, शेख मॅडम, प्रा. बनसोडे सर, कदम सर, भोर सर, देशमुख सर, गव्हाणे सर, सेवक श्री पाचारणे व श्रीमती पठाडे या सर्वांच्या हस्ते व उपस्थितीत ऑइल पेस्टल या रंगाचे वाटप केले.
या विद्यार्थ्यांना हे रंग हातात मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य व आनंद बघण्यास मिळाला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रावसाहेब सातपुते सर यांनी कला छंद असलेल्या या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये कला कलाविषयक किती महत्त्वाचा आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये यश कसे मिळवाल असे मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. कलाशिक्षक यांनी विद्यालयात हा उपक्रम राबवल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष.मा.श्री. दादाभाऊजी कळमकर साहेब, उपाध्यक्ष शांताराम गाडे पाटील, सचिव श्री. कातोरे साहेब आणि सर्व आदरणीय संस्था पदाधिकारी यांनी ही या उपक्रमास आणि विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.