पावसाने नदीला पुराचे स्वरूप आल्याने गावातील रुग्णाची अश्याप्रकारे झाली हेळसांड, पहा बातमी सविस्तर.

गेले कित्येक दिवसापासून पावसाने सगळीकडे थैमान घातली आहे. नदी, नाले, ओढे या सगळ्यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनसामान्यांना या पावसाचा चांगलाच फटका पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे 75 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होत आहेत. देश विकसनशील होत आहे, पण देश विकसनशील होत असताना खरंच देशातला ग्रामीण भाग विकसनशील होण्याच्या मार्गावर आहे का ? ग्रामीण भागाची खरंच सुधारणा झाली आहे का ? त्यांना संपूर्ण सोयी सुविधा पोहोचल्या आहेत का ? याचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, ग्रामीण भाग अजून पण विकासाच्या बाबतीत पिछाडीवर पडलेला आहे.
अशीच एक बातमी घडली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला आहे. नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. आणि अशातच हिंगणघाट तालुक्यामधील जानकी नदीला पूर आला आहे. मात्र येथील गावात नदीला पूर आल्याने एक रुग्ण गावातच अडकला आहे. या ठिकाणी गावकऱ्यांनी एकमेकांच्या मदतीने दुसऱ्या मार्गावरील नाला पार करून त्याला रुग्णालयात पाठवण्यात मदत केली. नाल्याला छातीवर पाणी असताना त्यातून वाट काढत समस्त गावकऱ्यांनी खाटीच्या सहाय्याने त्या रुग्णाला रुग्णवाहिकेजवळ नेले आणि तेव्हा सर्वांचा जिवात जीव आला.
50 वर्षीय संतोषराव पाटील यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चांगली नव्हती. मंगळवारी त्यांना अलीपुर रुग्णालयात उपचारासाठी नेले होते, त्यावेळेस डॉक्टरांनी औषधोपचार करून घरी पाठवलं. त्याच रात्री आलेल्या पावसाने यशोदा नदीला चांगलाच पूर आला आणि चाणकी भगवा हा मार्ग अक्षरशः बंद झाला. आणि इकडे संतोष पाटील यांची प्रकृती खालावली. मात्र नदीला पूर आल्याने रस्ता बंद, नाल्याला छातीपर्यंत पाणी मग अशा बिकट परिस्थितीमध्ये काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला.

मग गावकऱ्यांनी ठरवलं की, गावातील नाल्याच्या पुरातून मार्ग काढायचा. गावकऱ्यांनी एकत्र येऊन संतोष पाटील यांच्या घरी असलेल्या बैल बंडीच्या सहाय्याने नाल्यापर्यंत आणलं. आणि त्यानंतर खाटेच्या मदतीने छातीवर पाण्यातून वाट काढून दिली. जानकी भगवा रस्ता बंद असल्याने गावकऱ्यांनी संतोष पाटील यांना जानकी येथून सलाम नगरला जोडणाऱ्या नाल्याला पार करण्याचा निर्धार केला. व त्याला रुग्णालयात पाठवले नागरिकांनी केलेल्या मदतीमुळे या रुग्णाला पुरातून वाट काढून सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.