ऐन दिवाळीत रेशन मिळत नसल्याने पहा या पठ्याने असे काही केले कि पोलीस देखील वैतागून गेले.
सणाचा राजा आणि सगळ्यात मोठा सण समजला जातो. तो म्हणजे दिवाळी. दिवाळी सारखा सण तोंडावरच येत असताना रेशन दुकानांमध्ये धान्य मिळत नसल्यामुळे गावातील ग्रामस्थाने पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी झोपा आंदोलन केल्याची घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बिडकीन या ठिकाणी घडली आहे. हे आंदोलन पाहिल्यानंतर पोलीस देखील काही वेळेसाठी आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर पोलिसांनी त्या व्यक्तीची समजूत काढली आणि परत पाठवून दिले पण या घटनेची परिसरामध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळाली आहे.
दिवाळी सण असल्याने आपल्या घरामध्ये गोडधोड पदार्थ बनविण्याची धामधूम सगळ्याच घरात पाहायला मिळते त्याचप्रमाणे सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी सरकार स्वस्तात अनेक पदार्थ रेशन दुकानांमध्ये उपलब्ध करून देत असतात मात्र औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बोकड जळगाव येथील नारायण कचरू खरात हे जेव्हा रेशन आणण्यासाठी रेशन दुकानात गेले त्यावेळेस त्या संबंधित रेशन दुकानदाराने त्यांना रेशन दिलेच नाही. गेल्या दोन महिन्यापासून चक्रा मारून देखील रेशन मिळत नाही म्हणून घरात हातबल झाले होते दिवाळी सारखा सण आहे आणि आता दिवाळीला घरामध्ये गोडधोड पदार्थ बनवायचं झालं तर घरात कोणतेही रेशन नाही आणि त्यातही आता दुकानदार रेशन देत नसल्याने खरात अक्षय हतबल झालेले पाहायला मिळाले दिवाळीसारखा सण असताना देखील रेशन मिळत नसल्याने घरात यांनी त्या दुकानदाराकडे विनंती केली पण काहीच फायदा झाला नाही.
खरात यांनी रेशन दुकानदाराकडे विनवणी करून देखील त्याने घरात यांचं काहीच ऐकले नाही आणि प्रयत्न करून रेशन मिळत नसल्याने कचरू खरात हे थेट बिडकीन पोलीस ठाणे या ठिकाणी गेले त्याचप्रमाणे मला रेशन मिळत नाहीये रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल करायचा आहे अशी मागणी ते करू लागली पण पोलिसांनी गुन्हा दाखल करता येत नसल्याची माहिती देऊन खरात यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण खरात हे काहीच ऐकून घेत नव्हते पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याने खरात यांनी पोलीस ठाण्यातच झोपा आंदोलन सुरू केलं. तब्बल तीन तास खरात यांचे आंदोलन सुरूच होतं तर पोलिसांना आपली व्यथा सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील येत होते दिवाळी सारखाच असताना मला घरात रेशन हवा आहे पण हा रेशन दुकानदार मला रेशन देत नाही आता मी घरी काय सांगू आणि माझी दिवाळी मी कशी साजरी करू माझ्यापुढे हा प्रश्न उभा आहे. काहीही करून त्या दुकानदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे असं खरात पोलिसांना सांगत होते आणि हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील वाहत होते.
रेशन मिळत नसल्यामुळे खरात तीन तास पोलीस ठाण्यामध्ये झोपा आंदोलन करत होते त्यांनी पोलीस ठाण्यामध्येच ठिय्या मांडून घेतला होता त्यामुळे अखेर बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तहसीलदार शंकर लाड यांना फोन करून सदरच्या घटनेची माहिती दिली. यावेळी तहसीलदार यांनी संबंधित व्यक्तीची माहिती पाठवण्यास पोलिसांना सांगितलं अक्षरशः वैतागून पोलिसांनी सायंकाळी सहा वाजता खरात यांची समजूत काढली आणि त्यानंतर ते निघून गेले मात्र ही घटना घडल्यानंतर तेथील परिसरामध्ये याबाबतची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. दिवाळी सारखा सण हा प्रत्येकासाठी आनंदाचा सण असतो आणि सणाच्या वेळेस घरातील मंडळी किंवा घरातील लहान मुले मुली यांचे वेगवेगळे हट्ट असतात त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये खाण्याची खूपच चंगळ असते आणि हे खाण्याचे पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य किंवा रेशन जर आपल्याला मिळाले नाही तर जो करता धरता आहे त्याच्यापुढे बरेच प्रश्न उभे राहतात कारण त्याला घरामध्ये एकाला नाही तर त्या घरातल्या लहान मुला बाळांना सुद्धा उत्तर द्यावा लागत असतं आणि त्यामुळे या दुकानदाराने जेव्हा रेशन देण्यासाठी नाकार दिला तेव्हा खरात यांना सुद्धा हाच प्रश्न उभा राहिला असता यांचीही आगळे वेगळे आंदोलन त्या दिवशी पाहायला मिळाली.