ठाण्यात अवतरणार नक्षत्र मिस – मिसेस इंडिया नक्षत्र २०२२ चे आयोजन.
बोध इंटरटेन्मेंट आयोजित मिस – मिसेस इंडिया नक्षत्र २०२२ चे पर्व चौथे ठाण्यात आयोजित करण्यात आले आहे. बोध इंटरटेन्मेंट गेली तीन वर्ष सातत्याने सौंदर्य क्षेतात स्पर्धेचे आयोजन करुन महिला वर्गासाठी भव्य असा मंच तयार करत आहे.
मिस – मिसेस इंडिया नक्षत्र स्पर्धेचे आयोजन सुबोध कांबळे यांच्या संकल्पनेतुन साकार करण्यात आले आहे तर या स्पर्धेत ग्रुमिंग प्रशिक्षक सौ. अर्चना पवार ( मिसेस इंडिया नक्षत्र २०२१, ब्रँडअँबेसॅडर, शोस्टॉपर २०२२ ) यांच्या मार्गदर्शनात सहभागी स्पर्धकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्पर्धेची सुरुवात कु. सार्था गोरे ( मिस इंडीया नक्षत्र २०२१,ब्रँडअँबेसॅडर, शोस्टॉपर २०२२) करणार आहे. स्पर्धाकांना दिल्या जाणार्या कपड्यांचे निर्मीती सौ. मुग्धा नारलकर ( कॉस्टुम डिझायनर ) यांनी केले आहे. स्पर्धेत मेकअप सुविधा उपलब्ध असुन सौ. मनीषा कदम, सौ. माही मिश्रा, सौ. अष्निका अधिकारी, सौ. जया महेश्वरी हे मेकअप् आर्टीस्ट म्हणुन महत्वपुर्ण जबाबदारी काम करणार आहे. स्पर्धेत विषेश प्रमुख उपस्थीत म्हणुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ श्री. नितिन शिंदे ( कोकण विभाग / ठाणे शहर : अध्यक्ष ) महाराष्ट्र नवनिर्माणसेना सौ. मंजुळा डाकि ( उपशहर अध्यक्षा / ओवळा माजिवाडा घोडबंदर विभार उपाध्यक्षा ), सौ. संध्या भोईर-पंडीत ( मिस-मिसेस इंडिया नक्षत्र २०२१ परिक्षक ), श्री. निशिकांत शिंदे ( लक्ष्मी फिल्म मुंबई ) तसेच राजकीय, मनोरंजन, मिडीया क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही स्पर्धा ठाण्यात पारपडणार आहे.
मिस – मिसेस इंडीया नक्षत्र २०२२ च्या या स्पर्धेत देशभरातुन अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला त्यातुन निवड केलेल्या अंतिम स्पर्धकांना मिस-मिसेस इंडीया नक्षत्र च्या महामंचावर आपल्या डोक्यावर सौंदर्याचा किताब मिळवण्याची संधी मिळाली असुन विजेत्यास्पर्धकांना सोन्याचे दागिने आकर्षक भेट म्हणुन दिले जाणार आहे.
हेमलता गुप्ता, अनुष्का भुवड, प्रियांका मोरे, मिना मेरिया, स्नेहल अडसुळे, रेवयी अय्यर, वैशाली चव्हाण, ग्रीष्मा पाटील, सुप्रिया कांबळे यासर्व स्पर्धकांना स्पर्धेत नावलौकिक मिळवण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेकरीता प्रसिध्दी माध्यम म्हणुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, न्युज मराठी बाणा, तरुण आव्हान, चौफेर वार्ता, दैनिक मी सुधारक यांचे सहकार्य लाभले आहे.