बर्डे भगिनींना गोल्ड मेडल, मुसळे, कुसकरांना बढती वनकुटेकरांनी केला सन्मान.
वनकुटे येथील ॠतुजा बर्डे व ॠतिका बर्डे या भगिनींनी बेल्ट सेलसिंग क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल पटकाविल्याबद्दल तर ग्रामपंचायत कर्मचारी शशिकांत मुसळे व जगदीश कुसकर यांची जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यात बढती झाल्याबद्दल वनकुटे ग्रामस्थांचा चौघांचा हृदय सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
वनकुटयाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अॅड. राहुल झावरे यांनी सांगितले की, दुर्गम भाग म्हणून परिचित असलेल्या वनकुटे येथील बर्डे भगिनींनी गोंदीया येथे पार पडलेल्या बेल्ट रेसलींग क्रीडा प्रकारात गोल्ड मेडलची कमाई करून वनकुटयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. बर्डे भगिनींकडे खेळातील कौशल्य असून भविष्यात त्या यशाचे शिखर पादाक्रांत करतील यात शंका नाही. ग्रामपंचायत कर्मचारी शशिकांत मुसळे व जगदीश मुसळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रामाणिक सेवा केल्यानंतर त्यांना आता जिल्हा परिषदेच्या सेवेत सामाऊन घेण्यात आले आहे. त्यांना मिळालेली बढतीही वनकुटयाच्या ग्रामस्थांसाठी आनंद देणारी आहे.
यावेळी कारभारी पाटील मुसळे, नारायण पाटील गागरे, मा. उपसरपंच भास्कर शिंदे, उपसरपंच बाजीराव काळनर, ग्रामपंचायत सदस्य कारभारी खामकर, रामदास शेलार, भाउसाहेब वालझाडे, प्रा. भिमराज मुसळे, रामदास काळे, साहेबराव गागरे, शरद मुसळे, प्रकाश केदारी, दिपक खामकर, दिपक गुंजाळ, काशिनाथ भगत, भाऊसाहेब खामकर, संजय शेवंते, बाळासाहेब शिंदे, पांडूरंग कसबे, संपत घोेडके, बाळासाहेब खामकर, बबन काळे, पांडूरंग मुसळे, भास्कर औटी, रामभाऊ साळवे, राजू डहाळे, बंडू कुलकर्णी, बाळासाहेब बर्डे, जालिंदर बर्डे, सुरेश बर्डे, गणेश ढवळे, बाळासाहेब बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.