रस्त्याच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्याने केली अंघोळ, आमदार गाडीतून उतरून म्हणाले, “आता तूला…”

रस्त्यांवरचे खड्डे, आणि खड्ड्यांमध्ये रस्ते हे काही नवं नाहीये. वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. या खड्ड्याला अनेक रहिवासी वाहनधारक वैतागलेले आहेत. मात्र कराव काय हे कुणालाही कळत नाही. प्रशासन खड्डे बुजवत नाही प्रत्येक वर्षी पाऊस येतो आणि प्रत्येक वर्षी रस्त्यांना खड्डे पडतात. फक्त काय ते कमी जास्त असतात. कधी मोठी साईज, कधी लहान साईज काही ठिकाणी तर अगदी रस्त्यांवरती तलावाची तलाव असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे त्या ठिकाणी असतात या खड्ड्यांचे करायचं काय कशा पद्धतीने प्रशासनाला धडा शिकवायचा, यासाठी प्रशासनाला कसे धारेवरती धरायचं अशा अनेक गोष्टी घेतल्या जातात.
प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना अद्दल घडवण्यासाठी एका युवकाने अनोखीच गोष्ट केली आहे. या युवकांना रस्त्यांमध्ये जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये जे पाणी साचले त्याच पाण्याने अंघोळ केली आहे. आणि तेही लोकप्रतिनिधी असणाऱ्या आमदारांच्या समोरच. हा व्हिडिओ सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. आणि त्याला सर्वजण दात देत आहेत. अनेक जण या युवकाच्या आंदोलनाला पाठिंबा देखील दर्शवत आहेत.
केरळमधील अंमल मलपूर या ठिकाणी आहे त्या खड्ड्यातल्या पाण्याने चक्क आंघोळ करताना पाहायला मिळतोय. त्याने आमदाराच्या समोर आंघोळ करत या आमदाराचा या प्रशासनाचा निषेध केलाय. महामार्गावरील खड्ड्यांचे विदारक वास्तव आहे या मुलांना प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्या ठिकाणी आमदारही जात आहे त्याच्याशी बोलत आहेत मात्र तो युवक आपली आहे ती कृती करतोय. कारण की रस्त्यांवरती मोठे मोठे खड्डे पडतात आणि या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचते. हे पाणी अगदी एखाद्या तलावा प्रमाण साचत आहे.
या आमदारांना पाहताच हा युवक त्या खंडात उभा राहून त्यांना साष्टांग दंडवत करतोय आणि तुम्ही देखील अंघोळीला या असं त्या आमदारांना.. लक्ष वेधण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी या तरुणांना अनोख्या पद्धतीने हे जे आंदोलन केला आहे, त्या आंदोलनाने या धिम्म असणाऱ्या प्रशासन लोकप्रतिनिधींना जाग येईल का हे पाहणं फार महत्त्वाचे ठरेल.