बीड : ग्रामसेवकाने घेतला गतिमंदतेचा फायदा, मुलीसोबत केल संतापजनक कृत्य. पहा बातमी सविस्तर.
महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस घडतात. या घटना थांबायचं नाव घेत नाही. भंडारा-गोंदिया यापाठोपाठ बीडमध्ये देखील अशीच एक घटना घडली.
बीडमध्ये प्रशासनातील एका अधिकाऱ्यानं एका दिव्यांग असणाऱ्या मुलीचा फायदा घेतला. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती असतो. यावर कायदे झाले मात्र अंमलबजावणी कोणतीही होत नाहीये. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन सामाजिक संस्था सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र महिला सुरक्षित नाहीत हे वास्तव नाकारता येत नाही. तरी देशात सातत्याने या घटना घडत असतात.
यामध्ये शहरी भाग किंवा ग्रामीण भाग असं काहीही नाहीये, दोन्ही ठिकाणी महिला असुरक्षितच आहेत. बीड मधील एका खेडेगावात गतिमंद मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर येतीय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय. या मुलीचा विनयभंग दुसरा तिसरा कोणी केला नसून एका ग्रामसेवकाने केल्याची बातमी समोर येत आहे.
28 वर्षीय गतिमंद मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली. या तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला. ग्रामसेवक पदावर कार्यरत असणाऱ्या आरोपीने हा गुन्हा केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या चकलांबा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. ग्रामसेवक मोटर सायकलवरती आला आणि त्यानं त्या मुलीचा विनयभंग केला. मुलीन आरडाओरडा केला असता ग्रामसेवकांना त्या ठिकाणी हून पळ काढला. मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला आणि त्यानंतर तिच्या आईने पोलीस ठाणे गाठले. ग्रामसेवक इस्माईल वजीर पठाण याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.