सावधान ! तुमचीही ऑनलाइन फसवणूक होऊ शकते, नांदगाव तांडा येथील शेतकऱ्याची ३४८०० रु.ची फसवणूक.

सोयगाव:-विजय चौधरी तालुका प्रतिनिधी
तुमचे फोन पे नादुरुस्त आहे त्यामुळे फोन पे दुरुस्त करून घ्या असा सल्ला देत परराज्यातील टोलक्याने नांदगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याला ऑनलाइन बँकिंग मध्ये ३४ हजार ८०० रुपयांचा गंडा घातला हा प्रकार शनिवारी उघडीस आला याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार करण्यात आली आहे जितेश रणसिंग चव्हाण (वय २१) हा शेतकरी तरुण फोन पे वरून बँकिंगचे व्यवहार करायचा त्याला कानपूर वरून काही दिवसापूर्वी फोन आला आम्ही फोन पे सर्वेक्षण करीत आहोत तुमचे फोन पे नादुरुस्त झाले आहे त्यामुळे त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक संदेश पाठवतो असे सांगितले त्यानंतर समोरून संदेश आल्यानंतर जितेशला एक ओटीपी आला जितेशने तो ओटीपी समोरच्याला दिल्यानंतर त्याच्या खात्यातील पहिल्या टप्प्यात ४८०० रुपये त्यानंतर तीन वेळा १० हजार असे एकूण ३४ हजार ८०० रुपये खात्यावरून गायब झाले याबाबत जितेश रणसिंग चव्हाण यांनी पोलिसांच्या सायबर सेल कडे तक्रार दाखल केली आहे याबाबत गुन्हा दाखल झालेला नाही
चौकट:-
सोयगाव तालुक्यात ऑनलाईन बँकिंग व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांनी अनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन व्यवहार करू नये व आपल्या खात्याच्या ओटीपी ची गोपनीयता बाळगावी कोणताही गैरप्रकार आढळल्यास तातडीने सोयगाव पोलीस ठाण्याची संपर्क साधावा अशी माहिती सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी दिली आहे