विदर्भ

भंडारा : एक्स गर्लफ्रेंडच्या सततच्या त्रासाला कंटाळला तरुण; जंगलातच घेतला गळफास…

लग्नापूर्वीची एक्स गर्लफ्रेंड वारंवार पैसे मागत असल्याने या तरुणानं आयुष्याचाच शेवट केला. या तरुणीकडून वारंवार ब्लॅकमेल केलं जात असल्याने कंटाळून विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे.भंडाऱ्यामध्ये एका तरुणाने एक्स गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. लग्नापूर्वीची एक्स गर्लफ्रेंड वारंवार पैसे मागत असल्याने या तरुणानं आयुष्याचाच शेवट केला.

या तरुणीकडून वारंवार ब्लॅकमेल केलं जात असल्याने कंटाळून विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे.या प्रकरणी तरुणीसह दोघांवर भंडारा जिल्ह्याच्या साकोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राजेश रामकृष्ण वाघाडे असं मृताचं नाव आहे. याप्रकरणी अस्मिता सीताराम भोयर आणि तिलक ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

तरुणाचा मृतदेह मोहघाटा जंगलात फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या बॅगमध्ये आढळलेल्या सुसाईड नोटमध्ये कंटाळून आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आलं होतं. राजेशने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारण लिहिलं होतं.अस्मिता त्याला वारंवार पैशाची मागणी करीत होती. तसंच तिलक ठाकरे तिला पाठिंबा देत होता.

हे दोघं मिळून सतत धमकी द्यायचे की परिवारासह तुलाही बरबाद करेन. ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे घेतले जात होते. याचा त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्याने आपल्या सुसाईट नोटमध्ये लिहिलं आहे. या याप्रकरणी तरुणीसह दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून साकोली तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!