भाजप खासदाराचा मोठा आरोप, माजी महसूल मंत्र्याचे नातेवाईक डोक्याला बंदूक लावतात पहा सविस्तर.

अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार होतं आणि त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांचा सरकार आलं. जेव्हापासून शिंदे फडणवीस हे सरकार आलं तेव्हापासून या नव्या सरकारांमध्ये विखे यांच्या पदरी मंत्रिपद मिळाले. आणि त्यानंतर पुन्हा एकदा नगर जिल्ह्याला विखे आणि थोरात यांचा संघर्ष अनुभवायला मिळतोय.
मंत्रीपदाची शपथ घेतल्या पासून ते आत्तापर्यंत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्ये कधी मंत्री विखे बोलतात तर कधी माजी मंत्री थोरात बोलतात. आता नवीन काय बोलणे झाले किंवा इतका मोठा गंभीर आरोप लावण्यात आला आहे किंवा कोणी लावला यावर ती नजर टाकुयात,
अडीच वर्षाच्या काळात नगर जिल्ह्यात महसूल खात्याचे काय झालं याचा संपूर्ण तपशील माझ्याकडे आहे. यापुढेही कोणी चुकीची कामे करून घेतली जाणार आहेत उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून नगर जिल्हा वाळू तस्करी मुक्त करण्यात येईल. वाळूचा वैद्य व्यवसाय करणारे त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. माझ्या कार्यकर्त्यांना हा इशारा आहे ज्या कोणाला धंदा करायचा असेल त्यांनी माझ्यापासून दूर व्हावा. अशा लोकांची मला गरज नाही असा सज्जड दम खासदार सुजय विखे पाटील यांनी भरला.
तर पुढे ते म्हणतात मधल्या काळात वाळू तस्करांना पाठीशी घालायचे प्रकार घडलेत. त्यांची मस्ती मला उतरायची आहे. माही सहकार मंत्र्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते हे सामान्य लोकांच्या डोक्याला बंदूक लावण्या पर्यंत मजल गेली होती. त्या जोरावर ती सर्व काही सुरू होतो आता नगर जिल्हा हा वाळू मुक्त करायचा आहे. त्यासाठी लवकरच एक पोर्टल सुरू करणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
नागरिकांना वाळू तस्करीसंबंधीच्या तक्रारी आणि छायाचित्रे अपलोड करता येतील. त्याची तातडीने दखल घेऊन कारवाई करणारी यंत्रणा उभारण्यात येईल असे देखील सांगितला. महसूल खात्यात प्रचंड भ्रष्टाचार वाढला आता तोडगा काढला पाहिजे असे देखील म्हणतात. त्या काळामध्ये राज्याचे महसूल खातं कशा पद्धतीने भ्रष्टाचारमुक्त काम करता येईल हे पाहणे फार महत्त्वाचं ठरेल. मात्र माजी महसूल मंत्री आणि महसूल मंत्री यांच्यातला संघर्ष असाच आहे.