मोठी बातमी : शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमधून हकालपट्टी.
काल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा बदल पाहायला आपल्याला दिसला. यामध्ये शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. एकनाथ शिंदे व सोबत काही अपक्ष यांनी मिळून सत्ता स्थापन केली पण या सत्तेमध्ये एक प्रश्न असा निर्माण झाला की, नेमके शिंदे गटातले एकनाथ शिंदे कोणाचे ? यांचा पक्ष कोणता ? सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती कशा पद्धतीने झाली ? आणि हे सरकार स्थापन केले गेले हे काही सर्व चालू असताना आजच्या दिवशी माननीय माजी मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांनी एक पत्रक जारी करून त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून काढण्यात येत आहे अस सांगितले हे लिहिलेलं पत्र राष्ट्रीय कार्यकारिणी व कमिटी यांना पाठवण्यात आले. आता शिंदेंना शिवसेना पक्ष मधूनच हकालपट्टी झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे नक्कीच शिवसेनेचे राहिलेले नाहीत हे आपणास लक्षात येते.
महाविकास आघाडी सरकार मधून शिवसेनेचे काही बंडखोर नेते घेऊन शिंदे गट स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दलची सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतून अधिकृतरित्या हकालपट्टी केल्याची बातमी समोर येते. अधिकृतरित्या एक पत्रक देखील प्रकाशित करण्यात आले आहे त्यामध्ये शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना रिमूव्ह केलं असं लिहिण्यात आले. आज पत्रकार परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मत मांडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नाही असे स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांना विचारला असता त्यांनी युती कायमची तुटल्याचं असं देखील सांगितलं होतं. संपूर्ण महाराष्ट्राला राजकारण पाहता प्रश्न होता की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे की शिंदे गटाचा की भाजपाचा मात्र आता शिवसेनेकडून हे पत्रक जारी झाल्यानंतर काहीसा संभ्रम थांबलेला आहे. मात्र शिंदे गट आणि भाजपाचं हे नवसरकार याबद्दल पुढे काय घडणार आहे कशा पद्धतीने हे सरकार महाराष्ट्रात दम धरेल हे पाहणं फार महत्त्वाचं ठरेल. पण आता आपल्याला पाहायचं आहे की एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केलेली युती पुढे किती दिवस दम धरते