मोठी बातमी : घरावर तिरंगा ध्वज लावण्यासाठी गेला आणि त्याने जीव गमवला, पहा बातमी सविस्तर.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि त्यामुळेच तीन दिवस अमृत महोत्सवाची तयारी आता संपूर्ण देशात सुरू आहे. 13 ऑगस्ट पासून या महोत्सवाला सुरुवात झाली या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आपण ज्या ठिकाणी राहत आहोत त्या ठिकाणी तिरंगा झेंडा हा लावायचा आहे. आपल्या घरापासून उंची वरती हा झेंडा लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या मोहिमेच्या अंतर्गतच बीड मधील एक युवक आपल्या घरावरती देखील इतरांप्रमाणे राष्ट्रध्वज असावा यासाठी तो त्याच्या घरावर चढतो. तो ध्वज घरावर कुठे लावावा यासाठी जागा शोधात असतो, यावेळी त्याच्या घराच्या जवळून विजेच्या तारा गेलेल्या आहेत. त्याची ध्वज लावण्याची लगबग चालू असताना त्याच्या हे ध्यानी नाही आले आली त्याच्या हातातील सळई तेथील विद्युत तारेला लागतात.
त्याच क्षणी त्याला तारेचा जोराचा झटका बसतो आणि त्याच्या सोबत असा अनुचित प्रकार घडला. 30 वर्षीय तरुण घरावर झेंडा लावत असतानाच त्याला विजेचा धक्का बसला आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यातील वरपगाव या ठिकाणी शेखर मुक्तार हा आपल्या घरावर ते राष्ट्रीय ध्वज लावण्यासाठी चढला होता. त्याच वेळी त्याच्या हातामध्ये असलेल्या लोखंडी पाइप विद्युत तारेला लागल्यानं जोराचा धक्का बसला त्यामुळे तो वरतून खाली फेकला गेला. शेखर सकाळीच आपल्या घरावरती हा ध्वज लावण्यासाठी गेला होता. घराच्या गच्चीवर तो व्यवस्थित रित्या चालवताना विद्युत तारेला ध्वज पाइपची चिटकला आणि विजेचा धक्का लागून शेखर खाली फेकला गेला.
दरम्यान ही घटना घडताच शेखरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला. तिरंगी झेंड्याला असणारा पाईप यात विद्युत प्रवाह आला आणि त्यामुळेच शेखर चा दुर्दैवी मृत्यू झाला.
तिरंगा अभियानांतर्गत आपणही आपल्या घरावरती झेंडा लावण्यासाठी चढत असाल तर अवतीभोवती असणाऱ्या जे काही संकट आहेत ते एकदा पहा. आणि व्यवस्थित सतर्कता राखत आपल्या घरावरती तिरंगा ध्वज लावा.