मोठी बातमी: मूळच्या नगर जिल्ह्यातील असणाऱ्या पत्नीवर कोर्टाबाहेर माजी सैनिक नवऱ्याने केला गोळीबार पहा सविस्तर वृत्त
नगर पासून अगदी जवळ असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर न्यायालयाबाहेरएका इसमाने दोन महिलांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
न्यायालयामध्ये घटस्फोटाची केस चालू होती आणि तिथे केस चालू असताना कोर्ट परिसरांमधून सासू व पत्नी जात असताना त्या दोघींवर एक या इसमाने गोळीबार केला. घटस्फोटानंतर पोटगी मिळावी म्हणून यासाठीचा दावा दाखल करण्यासाठी आलेल्या आपल्या पत्नीवर व सासूवर पतीने पिस्तुलातून गोळीबार केला. या पतीने एकावेळी चार गोळ्या झाडल्या आणि त्यातल्या तीन गोळ्या या पत्नीला लागल्या असून तिचा जागीच मृत्यू झाला आणि एक गोळी लागल्याने सासू जखमी झाली आहे सासूला तातडीने शिरूरमधील रुग्णालयामध्ये दाखल केले गेले. हल्लेखोराने पोलीस जमाव पाहून हवेतही गोळीबार केला. या पतीला पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी कसून चौकशी केली त्या दरम्यान आपण एका लग्नाला आलो आहोत असे सांगितले आणि या प्रकारामुळे शिरूर मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तर आपण बघूया की नेमकं प्रकरण काय आहे :
सकाळी शिरूर येथे पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या परिसरामध्ये दीपक पांडुरंग ढवळे ( माजी सैनिक राहणार ठाणे ) यांनी त्याच्याकडे परवाना प्राप्त असलेल्या पिस्तुल मधून त्याची पत्नी मंजुळा झांबरे ( रा. वाडेगव्हाण तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ) व तिच्या सोबत असलेली तिची आई यांच्यावर गोळीबार केला आहे तो हल्लेखोर हा लष्करातून निवृत्त झालेला असून त्याने केलेल्या गोळीबारात मध्ये त्याची पत्नी मंजुळा वय 35 हिचा जागीच मृत्यू झालेला असून याची सासू तुळसाबाई रंगनाथ झांबरे (वय ५५, दोघीही रा वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) ही एक गोळी लागून गंभीर जखमी झाली आहे.
संबंधित हे पारनेर तालुक्यातील रहिवासी असून त्यांनी पोटगी मिळावी म्हणून यासाठी जो दावा केला होता आज त्याचा शिरूर न्यायालयामध्ये निकाल असल्यामुळे त्या दोघी सकाळी लवकरच निघाल्या होत्या. त्यासोबतच हल्लेखोर ढवळे हादेखील न्यायालयात हजर झाला होता. मंजुळा ढवळे या महिलेने आपल्या पतीविरोधात पोटगीचा दावा दाखल केला होता. आणि त्याचीच आज शिरूरच्या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती. या खटल्याचा आज निकाल होता आणि या निकालासाठी दिपक ढवळे हल्लेखोर आपल्या भावाचा सोबत आला होता. आणि त्याने येताना स्वतःजवळ पिस्तूल दोन पिस्टल आणि सुरा सोबत आणलेला होता. मंजुळा ही तिच्या आईसोबत शिरूरच्या न्यायालयामध्ये आली होती आणि न्यायालयाच्या परिसरामध्ये तिघांमध्ये वाद-विवाद झाले आणि त्याचाच राग मनात येऊन या हल्लेखोर दिपक ढवळे ने कमरेचा पिस्तुल काढून या दोघींवर फायरिंग केली. आणि त्याची पत्नी मंजुळा तीन गोळ्या लागल्यामुळे त्याठिकाणी मृत्युमुखी पडली तर सासू ला एक सासूला लागल्यामुळे ती जखमी झाली आणि तिला उपचारासाठी शिरूरच्या रुग्णालयांमध्ये दाखल देखील केले गेले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन आज पाच संपूर्ण परिसरामध्ये नाकाबंदी केली आणि त्यानंतर आरोपी ढवळे याला अटक केली.