मोठी बातमी : माफियाने पोलीस अधिकाऱ्याला डंपर खाली चिरडले.

पोलीस दलाला बऱ्याचदा नावं ठेवली जातात. मात्र खऱ्या अर्थाने आपलं कर्तव्य बजावत असताना अनेक जे पोलिस दलातील पोलिस अधिकारी आहे ते शहीद होत असतात. आपले कर्तव्य चोखपणे बजावत असतात. कारण की कायदा आणि सुव्यवस्था सुरक्षित राहावा. सर्वसामान्य माणूस सुरक्षित राहावा यासाठी त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिलेली असते. ती जबाबदारी चोखपणे पार पाडत असतात. अशाच पद्धतीने ड्युटी वरती असताना आपलं कर्तव्य पार पाडत असताना अत्यंत मन हेलावणारा प्रकार घडला आहे.
हरियाणातील धडाकेबाज डीएसपी यांच्याबद्दलची ही बातमी आहे सुरेंद्रसिंह हे आपल्या कर्तव्यावर असताना अवैध खाणकाम थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. यासाठी ती आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. हरियाणाच्या जिल्ह्यात खाण माफियांना एका उच्चपदस्थ पोलिस अधिकाने अडवण्याचा प्रयत्न केला मात्र या अधिकाऱ्याला डंपरखाली आणले. ते अवैधरित्या खडकातून भरलेला ट्रक थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण डंपर चालकाने या अधिकाऱ्यावर डंपर चालवला.
गुरुग्राम ला लागून असल्याने जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील गावातील हि घटना आहे. डीएसपी सुरेंद्रसिंह यांच्या गावाजवळील टेकडीवर बेकायदेशीरपणे काम सुरू होतं अशी माहिती त्यांना मिळाली. आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी कारवाई करण्यासाठी ते तिथे पोहोचले. सकाळी 11 वाजता आपल्या पथकासह ते दाखल झाले. पोलीस पथकाला पाहताच तेथील डंपर चालक गाड्या घेऊन पळाले. पोलीस अधिकारी गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण डंपर चालकाने या अधिकाऱ्याच्या अंगावर डंपर घातला आणि यात यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर खाण माफिया त्या ठिकाणाहून पळून गेला. त्याची माहिती मिळताच तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून गाव आणि आरवली डोंगर परिसरात शोधमोहीम सुरू झाली. तर उपविभागातील हरवली भागातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात खाण माफिया यांचे उत्खनन सुरू असताना, त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी सुरेंद्रसिंह हे प्रयत्न करत होते मात्र या प्रयत्नांमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.