मोठी बातमी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना अचानक केले रुग्णालयात दाखल पहा बातमी सविस्तर.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा खासदार शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयामध्ये पुढील तीन दिवस उपचार घेण्यासाठी दाखल केलेला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची माहिती समोर आली आहे.
रुग्णालयात दाखल होण्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये मात्र डॉक्टरांनी सल्ला देताच शरद पवार यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पुढील तीन दिवस ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल रुग्णालयात उपचार घेणार आहेत.
महाराष्ट्र राजकारणामध्ये महत्त्वाचे सूत्रधार असणारे तसेच राजकारणातले चाणक्य समजले जाणारे शरद पवार यांचा मुक्काम पुढील तीन दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात काय उमरतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मात्र शरद पवार यांना रुग्णालयात कोणत्या कारणासाठी दाखल केला आहे हे अद्यापही समजू शकले नाहीये. याकडे आता सर्वांचं लक्ष आहे पुढील तीन दिवस शरद पवार हे रुग्णालयात उपचार घेणार आहेत त्यामुळे शरद पवारांचे चाहते असणारे त्याचबरोबर एनसीपीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
पुढील तीन दिवस साहेब उपचार घेण्यासाठी दाखल होत आहेत मात्र याचं कारण आता ही समोर आलं नाहीये