मोठी बातमी : पुण्यात पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडले, पहा बातमी सविस्तर.
मोठी बातमी हाती येत आहे, पोलीस हवालदार बद्दलची बातमी आहे. पोलीस हवालदाराला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे अटक करण्यात आली आहे.
एका 48 वर्षे पोलीस हवालदाराला शनिवारच्या दिवशी पुण्यात रंगेहात पकडण्यात आले. एका व्यक्तीकडून त्याने पाच हजार रुपयांची लाच घेतली आहे. सदरील हवालदाराचे नाव विजय शिंदे असून तो पुणे शहर पोलीस अंतर्गत कोथरूड विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये तैनात आहे. लाच प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगितले.
तक्रारदाराने असा आरोप केला आहे की, शिंदे यांनी आपल्या विरुद्ध सुरू केलेल्या प्रकरणाच्या कारवाई संदर्भात लाच मागितली होती. त्याचप्रमाणे या तक्रारदाराने यापूर्वी एसीबीच्या पुणे विभागाला देखील संपर्क साधला होता. त्या व्यक्तीकडून तक्रार आल्यानंतर एसीबी कार्यालयाच्या परिसरात सापळा रचण्यात आला. आणि या शिंदेला रंगीहात पकडून अटक करण्यात आली असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
फौजदारी प्रक्रिया त्यानुसार जर ती व्यक्ती बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील होण्याची किंवा कोणत्याही प्रकारे शांतता बिघडण्याची शक्यता आहे असे मानण्याचे कारण त्यांच्याकडे असल्यास पोलीस काही व्यक्तीविरुद्ध अशी कारवाई करू शकतात.
पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, प्रकरणाच्या कार्यवाही अंतर्गत पोलीस अशा व्यक्तींना नोटीस बाजवतात चेतावणी देतात की, अशा कोणत्याही कृतीत सामील झाल्यास दंड किंवा अटक सह दंडात्मक कारवाई देखील केली जाईल. कार्यवाहीचा एक भाग म्हणून त्या व्यक्तीला एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यासमोर उपस्थित राहण्यास सांगितले जातात.
या प्रकरणाचा तपास करणारे एसीबीचे निरीक्षक यांनी सांगितले की, कॉन्स्टेबल शिंदेला न्यायालयात हजर केले जाईल कोणीही लाच मागण्याचा प्रयत्न केल्यास लाचलुजपत विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे.