मोठी बातमी : संजय राऊत यांना तब्बल ” एवढा ” दिवसांची कोठडी !
मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान संजय राऊत यांना अटक केली होती, त्यांना अटक झाली हे त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी ED कार्यालयाच्या बाहेर येऊन सांगितलं होतं.
दिवसभरात संजय राऊत यांच्या बद्दल कुठला निर्णय येतोय त्यांना जामीन मिळतोय का ? किंवा त्यांना कस्टडी किती दिवसाची असेल ? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होतं. काल मध्यरात्री त्यांना अटक झाली. त्यानंतर सकाळपासूनच वेगवेगळ्या स्थरातून अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.
यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की, सकाळचा भोंगा बंद झाला, तर काँग्रेसचे म्हणलं आले की दबावतंत्र वापरले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसने तर संजय राऊत यांच्यासाठी निदर्शने केली. या सगळ्या घडामोडी मध्ये संजय राऊत यांच्या बद्दल ED आज काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
अत्यंत महत्त्वाचा निर्णय हाती येतोय, शिवसेनेचे नेते यांना पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली चौकशीसाठी बोलावलं होतं. तब्बल सोळा तास चौकशी झाली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं होतं. आणि मध्यरात्री अटकही केले.
संजय राऊत यांना चार ऑगस्ट पर्यंत ED कस्टडी देण्यात आली आहे अशी माहिती समोर येतेय.