मोठी बातमी : शिवसेना प्रवक्ते तथा खा. संजय राऊत यांना मध्यरात्री अटक.

मध्यरात्री खासदार संजय राऊत यांच्या सोबत काय घडलं ?
काल दिवसभर गोरेगाव येथील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आर्थिक व्यवहार या प्रकरणी संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच चौकशीसाठी बोलावले होते. तब्बल सोळा तासाची चौकशी झाली. सकाळी साडे अकरा वाजता वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्या पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. तब्बल 16 तासांच्या चौकशीनंतर कारवाई केली, त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाले.
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हे प्रकरण नेमकं काय आहे ?
पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात अनियमित असल्याचा आरोप होता. संजय राऊत यांच्या पत्नी आणि त्यांच्या सहकार्यांसोबत व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग आरोप आहे. एक जुलै रोजी चौकशीसाठी अधिकाऱ्यांकडे जबाब नोंद घेण्यासाठी उपस्थित झाले होते. त्यानंतर अनेकदा समजावलं होतं अखेर 27 ला तपास यंत्रणेने राऊत यांना चौकशीसाठी पुन्हा बोलावलं संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ते तर राऊत चौकशीला गैरहजर राहिले. संबंधित काही कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देखील अधिकाऱ्यांनी त्यांना दिले होते, परंतु त्यांची पूर्तता राऊत यांच्याकडे झाले नव्हती. मग रविवारी अधिकारी संजय राऊत यांच्या दारात हजर झाले.
राऊतताना ताब्यात घेतलं, इडीकडे जाताना “भगवा उपरणं हातात धरून हवेत वरती केल, मरेपर्यंत भगवा सोडणार नाही, मी पक्ष सोडणार नाही, कोणालाही शरण जाणार नाही, मी आता अटकेसाठी जात आहे, आता पेढे वाटा, महाराष्ट्र कमजोर होतो, आनंद साजरी करा अशा पद्धतीने त्यांनी घोषणा देत मीडियाला प्रतिक्रिया दिल्या. यावेळी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी देखील मीडियाला काही प्रतिक्रिया देत होते. आईला मिठी मारून ते आपल्या घराच्या बाहेर पडले मुलगी देखील या सगळ्या गोष्टींमध्ये दिसत होती. इडीची टांगती कारवाईची तलवार, दुसरीकडे परिवार हा अत्यंत संवेदनशीलपणे राऊत यांच्याकडे पाहत होता.
या सगळ्यांमध्ये संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. रात्री साडेबाराच्या सुमारास अखेर संजय राऊत यांना अटक झाली. कार्यालयाबाहेर येऊन सर्जेराव त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी संजय यांना अटक केली. ‘भाजपाला संजय राऊत ची भीती वाटते त्यांच्या अटके संदर्भात अद्याप आम्हाला कोणतीही कागदपत्रे आले नाहीयेत माझ्या भावाला या प्रकरणात गोवले जाते अशी प्रतिक्रिया दिली.