मोठी बातमी : विनायक मेटे यांच्या पत्नीला मिळणार विधान परिषदेत स्थान, या मंत्रीपदासाठी नाव पुढे ?

विनायक मेटे यांचे अपघातात निधन झालं मात्र हा अपघात होता की, हा घातपात होता याची आता तपासणी सुरू आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती अपघातामध्ये विनायक मेटे यांचे निधन झालं याबद्दल नवनवीन नावे समोर येत आहेत. मेटे यांचे भाषे तसेच पत्नी यांनी देखील संशय व्यक्त केला. या प्रकरणात सत्य काय आहे ते बाहेर येणे महत्त्वाचा आहे. मला घटना घडल्यानंतर कोणीच का काही सांगितलं नाही, किती वाजता घडलं कुठे घडलं एक ते दोन तास उलटून कुठलीच मदत का मिळाली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या सगळ्या गोष्टी मिटत आहेत तोच राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील यांनी एक मागणी केली आहे. त्यावर आपण एक नजर टाकू. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा मुंबई पुणे हायवेवर कार अपघातात निधन झाले. त्यानंतर मेटे यांचा अपघात झाला की, त्यांच्यासोबत काही घातपात करण्यात आला यावरून नवीन नवीन दावे करण्यात येत आहेत. यांना विधान परिषदेवर पाठवण्याची मागणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात येत आहे. यांना शिंदे गटाच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे अशी मागणी रूपाली पाटील यांच्याकडून केली जात आहे.
मेटे यांनी पाच वेळा विधान परिषदेचे आमदारकी भूषवली आहे. मेटे यांचे महाराष्ट्राचे राजकारणात व समाजकारणात योगदान पाहता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विधान परिषद आमदारकी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादीत मेटे यांचा समावेश असावा असं सुचित देखील केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी ज्योती मेटे यांना महिला व बालकल्याण मंत्रालय व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
यामध्ये रूपाली पाटील पुढे म्हणतात की, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतील महायुती 2014 मध्ये महाराष्ट्रात सत्तेत आली. मेटे यांनी 2014 पासून महायुतीला सहकार्य केले यांचे निधनाने शिवसंग्राम परिवार कोलमडला आहे. मेटे यांच्या कार्यकर्त्याला किंवा त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी व त्यासोबतच ज्योती यांना महिला व बालकल्याण मंत्रालय त्यासोबतच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन न्याय द्यावा. एक महिला कार्यकर्ता म्हणून ही माझी मागणी आहे असे रूपाली पाटील म्हणाल्या आहेत.
विनायक मेटे यांचा अपघात एवढा मोठा होता की त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला. डाव्या भागातील अंगरक्षकाचे दरवाजा कापूनच बाहेर काढावे लागले या प्रकारणी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.