MPSC बद्दलची सर्वात मोठी बातमी, यापुढे अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीत केला मोठा बदल.
या एमपीएससी वरती दबाव आणलं तर खबरदार, नवा अभ्यासक्रमावर व परीक्षा पद्धतील बाबत आयोगानेच विद्यार्थ्यांना इशारा दिला, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल केला आहे.
यापुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धरतीवरती एम.पी.एस.सी.च्या परीक्षा होणार आहेत. या नवीन परीक्षा पद्धतीला विद्यार्थ्यांनी विरोध केला. यावर एमपीएससीने रात्री ट्विट करून या संदर्भात इशारा दिला. नवीन परीक्षा पद्धतीत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न हटवण्यात आले असून विद्यार्थ्यांना सर्व पेपर वर्णनात्मक स्वरूपात द्यावे लागणार आहेत. सन 2023 पासून सर्व परीक्षांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे. याला विद्यार्थी संघटना विरोध करत असून कित्येक वर्ष MCQ पद्धतीचा अभ्यास केलेला विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल असे विद्यार्थ्यांचे मत आहे.
नवीन अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल केल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र, आंदोलन करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना वर MPSC कडून दबाव आणला जातोय. विद्यार्थी म्हणतात कि, एम.पी.एस.सी.ने हा निर्णय 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावा. यामध्ये कोणतीही संघटना समोर न येता विद्यार्थी ही मागणी करत आहे. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला .पण विद्यार्थ्यांना 25 जुलैला करण्यात येणारे आंदोलन मागे घ्याव लागल. पोलिसांनी परवानगी नाकारली होती, आंदोलन स्थगित केलं या पार्श्वभूमीवरती आंदोलन केले जाणार नाही असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं.
अभ्यासक्रम बदलून परीक्षा पद्धतीत बदल करण्याच्या निर्णयामुळे एम.पी.एस.सी. ठाम असल्याने विद्यार्थ्यांना हा निर्णय मान्य करावा लागणार आहे. मात्र कित्येक वर्षांपासून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे यामध्ये मोठ्या नुकसान होऊ शकतात. एम सी क्यू पद्धतीने अभ्यास करणारे त्यासाठी वेळ देणारे विद्यार्थी आता वर्णनात्मक स्वरूपात त्यांना पेपर लिहावं लागेल, हे थोडसं आव्हानात्मक ठरू शकतं. मात्र येत्या काळामध्ये एमपीएससी करणं काही बदल केले जात आहेत का ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल का? हे पाहणं फार महत्त्वाचे ठरेल…