सर्वात मोठी बातमी : ठाकरे सरकारचा ‘The End’ ?

महाराष्ट्र राज्यामध्ये कालपासून आपण पाहतो की बऱ्याच अनपेक्षित अशा घटना घडत आहेत कालपासून राजकीय घडामोडींना खूप वेग आला आहे थोडक्यात राज्यातील राजकीय वातावरण आहे ते खूप तापले गेले आहे. ते राजकीय वातावरण अवघ्या बारा तासात बदलल आहे. शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे ( Ekanth Shinde ) आणि 35 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे. त्याच प्रमाणे शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे( Ekanth Shinde ) यांनी ठाकरे सरकार पुढे खूप मोठा प्रस्ताव मांडला आहे तर पाहूया नेमका काय आहे हा प्रस्ताव ?
एकनाथ शिंदेंच्या प्रस्तावातले महत्वाचे मुद्दे :
१ भाजप सोबत सरकार स्थापन व्हावं
२ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
३ उपमुख्यमंत्री पद मिळाले तरच एकनाथ शिंदे गट शिवसेनेत राहणार.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे( Ekanth Shinde ) यांनी जे काही प्रस्ताव मांडले आहे हा प्रस्ताव खूपच विचार करण्यासारखा असून यावर नेमकं ठाकरे सरकार काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे अशा काही राजकीय गोष्टी घडत असताना यामध्ये शिवसेना आमदार तथा एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समजले जातात असे संजय राठोड हे यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी म्हणून सुरतला जाण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर आली आहे तर आपल्या पाहायचं आहे की आता ठाकरे सरकार पडणार आहे की आणखी काही वर्षे सत्तेत राहणार आहे अपडेट साठी फक्त ” न्यूजमॉल 18 “