सर्वात मोठी बातमी ; विरोधकांना वर चढ ठरणाऱ्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका !
”मी माझ्या मुलीला शिवसेनेला दत्तक देते. काल माझ्या घरी अचानक दोन पोलीस आले आणि संरक्षण देतो म्हणाले”, असं धक्कादायक विधान सुषमा अंधारे यांनी केलं,सुषमा अंधारे या गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्यावर चांगलाच निशाणा साधत आहेत. त्यांचं शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषण गाजलं होतं. त्यानंतर त्यांचं ठाण्यातील प्रबोधन यात्रेच्या कार्यक्रमातील देखील भाषण गाजलं होतं. ते मुद्देसूदपणे आपलं भाषण करतात.
त्यामुळे आता सुषमा अंधारे विरोधकांचे त्या डोकेदुखी ठरत आहेत. या दरम्यान अंधारे यांनी आपल्या जीवाच्या धोका असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली.महा प्रबोधन यात्रेचा कार्यक्रम आज नवी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण करताना सुषमा अंधारे यांनी आणखी एक महत्त्वाचं विधान केलंय. “माझे काही विद्यार्थी यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन चांगले अधिकारी आहेत ते मला सांगत आहेत की, ताई जरा जपून राहा तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्याकडे असे इनपूट आहेत.
आमची वट आहे की नाही? सरकार नसताना सुद्धा तुम्हाला आमची एवढी धास्ती आहे. आमची 9 तारखेला सभा झाली. चार दिवस उलटून गेले आणि 12 तारखेला गुन्हा दाखल केला. ९ तारखेला सभा झालीय. अजूनही दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली नाही. मग तुम्ही चिथावणीखोर कशावरुन म्हणत आहात? ते कसं शक्य आहे?”, असा सवाल सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणात केला.
पुढे त्या म्हणाल्या “मला कालपासून थेट जाणवतंय आणि काही इनपूट्सही मिळत आहेत. माझ्याकडे काल पोलीसही आले होते. मला पोलिसांनीही सांगितलंय. तुमच्यावर हल्ला होऊ शकतो, धक्काबुक्की केली जाऊ शकते किंवा काहीही होऊ शकतं, असं पोलिसांनी सांगितलं. हे इनपूट माझ्या कुटुंबियांना समजलं तेव्हा त्यांनी पटापट फोन करायला सुरुवात केली. मग माझे नातेवाईक सगळे काळजीत होते. माझे मामा म्हणाले तरी मागे हटायचं नाही. पण माझी आई काळजी करत होती की, आपल्याला एक मुलगी आहे. आपण का रिस्क घ्यावी? मी रात्रभर विचार करत होते की, होय माझ्या पदरात छोटं बाळ आहे ना, या बाळाची जबाबदारी शिवसेना घेतेय”, असं सुषमा अंधारेंनी सांगितलं.