भाजपा – शिंदे गट बिनसल, शिंदे गटातील आमदाराचा निलेश राणेंकडून नको त्या शब्दात अपमान.
राजकारणामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत या आपण दिवसंदिवस पाहत आहोत. आत्तापर्यंत उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्या घडामोडी तुम्ही पाहिल्या असतील मात्र शिंदे विरुद्ध भाजपा अशाही काही घडामोडी घडत आहेत. यामध्ये स्थानिक जे विरोधक आहेत ते विरोधकच राहिलेले आहेत हे दोन्ही नेते कोकणातले आहेत आणि त्यांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. हा वाद चिघळू शकतो याची ठिणगी आता पडलेली आहे.
त्यामुळे शिंदे गट भाजपा यांच्यामध्ये वाटाघाटी वरून नाराजगी सुर आहेत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या बद्दल एका पीसीमध्ये असं बोललं की, जेव्हा सुशांत सिंह यांचा मृत्यू झाला त्यामध्ये आदित्य ठाकरे यांची मोठ्या प्रमाणात बदनामीही नारायण राणे यांनी केली होती. आणि त्याच बदनामीची तक्रार आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती असं म्हटलं होते.
केसरकर यांच्या अश्या बोलण्याने भाजपा नाराज झाली होती आणि त्यामुळेच निलेश राणे यांनी थेट केसरकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आणि ट्विटरच्या माध्यमातून केसरकरांना खास ऑफर दिली या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणतायेत दीपक केसरकर म्हणतो की राणे बरोबर काम करायला तयार आहे. नोकरी मागायचे आहे तर नीट मागा एक तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे असं म्हणत निलेश राणे यांनी एकेरी उल्लेख करत केसरकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
त्यामुळे येत्या काळामध्ये भाजपा विरुद्ध शिंदे गट असा वाद पाहायला मिळतो की काय हे पाहणे फार महत्वाचं असणार आहे. मात्र सध्याच्या राजकारणामध्ये सर्वसामान्य जनतेला कुठलाही रस राहिलेला नाही.