दिवाळीसाठी घरी जाणाऱ्यांवर काळाचा घाला, बस आणि ट्रकच्या धडकेत प्रवाशांचे हात – पाय तुटले.
सध्या दिवाळीचे दिवस चालू आहेत आणि दिवाळीसाठी गावी जाणाऱ्यांची संख्या ही जास्त प्रमाणात आहे. कालच आलेल्या बातमीनुसार दिवाळीच्या सुट्टीसाठी जे कर्मचारी आहेत ते जास्त प्रमाणात असल्याने मुंबई पुणे हा महामार्ग जाम झाला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मध्ये परराज्यातून येणाऱ्या मजुरांची संख्या जास्त प्रमाणात आहे आणि अशातच काल एक घटना घडली. दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या मजुरावर काळाने घाला घातला आहे. घाटात बस उलटून जवळपास 14 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वाशिम मध्ये देखील चाळीस प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस पलटी झाली आहे.
सणासुदीच्या तोंडावरच मध्य प्रदेश मध्ये एक अपघात झाला आहे. या अपघातामध्ये जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मध्य प्रदेश मधील रिवा या ठिकाणी घडला आहे. एका मागून एक तीन वाहनांची धडक झाल्यामुळे हा अपघात घडला आहे. आणि या धडकेमध्ये बस व ट्रकच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आणि या अपघातामध्ये 40 हून अधिक जखमी सुद्धा झाली आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
यामध्ये मिळालेली माहिती अशी की, ही बस हैदराबाद हून लखनऊ कडे जात होती या बस मध्ये जवळपास शंभरहून अधिक प्रवासी होते. अपघातामध्ये १२ जणांचा जागीच तर २ जणांचा उपचारादरम्यान असा 14 जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. दिवाळी सणा निमित्त सिकंदराबाद इथून हे प्रवासी त्यांच्या घरी जात असताना हा अपघात घडला आहे.
ही बस रीवाच्या सहागी डोंगरावर पोहोचली असता चालकाचे बस वरील नियंत्रण सुटलं आणि ही बस ट्रकला धडकली यामुळे या अपघातात ४० जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे. अपघाताबद्दल मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री यांना समजल्यावर त्यांनी दुःख व्यक्त केले. घटनास्थळी पोलीस तसेच रुग्णवाहिका पोहोचले असून मदतकार्य जोरावर सुरू आहे.
यात मिळालेल्या माहितीनुसार, बसचा ब्रेक न लागल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघाताची भीषणता एवढी आहे की, बसच्या समोरच्या भागाचा चुराडा झालाय आणि प्रवासी हे बसमध्ये अडकले. या अपघातामध्ये अडकलेल्या प्रवाशांचे अक्षरशः हात आणि पाय तुटले आहेत. जखमींना बाहेर काढण्यात आले असून घटनास्थळी बस व ट्रक उभ्या आहेत पण अपघातात तिसरे वाहन हे घटनास्थळावरून फरार झाले आहे.