ब्रेकिंग : अक्षय कर्डिले यांच्या गाडीचा नगर औरंगाबाद रोडवर अपघात.
अहमदनगर शहराचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव तथा युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या गाडीचा नगर औरंगाबाद रोड वरील चेतना लॉन्स समोर अपघात झाला.
या अपघातामध्ये दोन्हीही गाड्यांची भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहेत. युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या वाहन क्रमांक MH16 BY 999 या गाडीला स्कोडा गाडीने मागून जोरात धडक दिली. आणि या अपघातामध्ये दोन्ही वाहनाचे नुकसान झाले आहे.
काही प्रतिनिधींनी युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘ मी सुखरूप आहे. मला काहीही झाले नाही काळजी करण्याचे कारण नाही.’ असे सांगितले. युवा नेते काही दिवसापूर्वी नगरहून मुंबईला जात असताना असाच अपघात आपल्या शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला देखील अपघात झाला होता.
त्या बातमीला काही दिवस उलटत नाहीत तेच माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या वाहनाचा नगर औरंगाबाद महामार्गावरील चेतना लॉन्स च्या समोर अपघात झाला आहे या अपघातामध्ये ते एकदम सुखरूप आहेत