ब्रेकिंग : औरंगाबादच्या नावाबाबत झाला मोठा निर्णय.
आता अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेला विषय मार्गी लावण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला अशी माहिती परीवहन मंत्री अनिल परीब यांनी दिली आहे.
आज मंत्रिमंडळात सर्वात मोठा बदल झालाय, अखेर औरंगाबादच्या नामांतराबद्दल तिडा आज मिटलेला आहे औरंगाबादचं नाव बदलेल आहे बैठकीमध्ये औरंगाबादच्या नाव बदलाबद्दल यशस्वी पाऊल उचलण्यात आले. ठाकरे सरकारकडून हिंदुत्वाचा मुद्दा हा महत्त्वाचा होता आणि याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर करण्याचं ठरलं होतं. आणि आज कॅबिनेटमध्ये तोच निर्णय घेण्यात आलाय औरंगाबाद च नाव आता संभाजीनगर होणार आहे. आणि त्याचबरोबर उस्मानाबादचे नाव देखील बदल करण्यात आलेला आहे अशी ही माहिती समोर येतील मात्र औरंगाबाद मध्ये अनेक जातीय घडामोडी घडत असतात अनेक संवेदनशील परिस्थिती त्या ठिकाणी आहेत आणि अशाच औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर करण्यात आले ठाकरे सरकारकडून हिंदुत्वाची जी जोपासना आहे किंवा हिंदुत्व जतन करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा ठरलेला होता. आणि सध्याच्या काळामध्ये औरंगाबादचं नाव आता संभाजीनगर झाला आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट यावरती आता पूर्ण राज्यात काय पडसाद उठतात हे पाहणं फार महत्त्वाचे ठरेल
1988 मध्ये औरंगाबादच्या सभेत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हा औरंगाबादचे नाव संभाजीनगर नारा दिला होता. तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर असा शहराचा उल्लेल केला जातो. 9 नोव्हेबर 1995 या वर्षात राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी असा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेने पाठवला. मात्र 2001 ला काँग्रेस आघाडी सरकाने रद्द ठरवला. आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत असताना संभाजीनगरचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावर आता निर्णय होण्याची शक्यता आहे.