ब्रेकिंग : अब्दुल सत्तार गोत्यात, दोन्ही मुलींची मोठ्या प्रकरणात नावं आली पुढे. पहा बातमी सविस्तर
पुणे पोलिसांनी बेकायदेशीरपणे पास झालेल्या विद्यार्थी संख्या 7800 टीईटी परीक्षेत पास झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये टीईटी परीक्षा मध्ये जे अपात्र ठरलेले आहेत याची यादी पोलिसांनी जाहीर केली होती. औरंगाबादचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींच्या नावांचा समावेश असल्याचं आता समोर आला आहे. आणि यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
बोगस शिक्षकांची नावे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून जाहीर करण्यात आली. त्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे. यामध्ये माजी मंत्री सत्तार यांच्या दोन्ही मुलींचा समावेश असल्याचं समोर आला आहे. हिना कौसर अब्दुल सत्तार शेख व उझमा नाहिद अब्दुल सत्तार शेख असे या मुलींची नावे आहेत.
या दोघीही सत्तार यांच्या औरंगाबाद मधील शैक्षणिक संस्थेत कार्यरत आहेत. या दोन्ही मुलींचे नावे पुढे आल्यामुळे आता या सत्ताधाऱ्यांवर कारवाई होणार का ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. पुणे पोपिचे व ED यांच्याकडून तपास चालू आहे दोन्ही ठिकाणी या प्रकरणाची समांतर चौकशी सुरु आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019 मध्ये टीईटी परीक्षा घेतली होती. या परीक्षेमध्ये सुमारे 16592 परीक्षार्थी मात्र झाले. प्रत्यक्षात पुणे सायबर पोलिसांनी निकाल पडताळून पाहिल्यावर 7800 परीक्षार्थी अपात्र ठरले होते.
पण याबाबतची माहिती घेतली असता शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन अधिकारी व खाजगी एजंट यांनी केलेल्या संगमतावरून पात्र विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले या प्रकरणामध्ये अनेक उच्च पदस्थ यांना अटक देखील केली गेली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही कारवाईचा बडगा उचलला असून 7800 विद्यार्थ्यांना अपात्र ठरवून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार असल्याचं समोर आल आहे. तसेच इथून पुढे या अपात्र उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. बोगस पद्धतीने पात्र झालेल्या मधील शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या या शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे.